शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

‘किंगमेकर’ कोश्यारींच्या शब्दांचा मंत्रिमंडळ फेररचनेत ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:06 IST

श्रीमंत माने लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्राच्या राजभवनात केवळ राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाच घरी गेल्यासारखे वाटते असे ...

श्रीमंत माने

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्राच्या राजभवनात केवळ राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाच घरी गेल्यासारखे वाटते असे नाही. गेल्या आठवडाभरातील देशपातळीवरील राजकीय घडामोडी पाहिल्या तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट होते. विशेषत: उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री व नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या बहुचर्चित फेररचनेतून हे सिद्ध होते.

आठवडाभराच्या अंतराने राज्यपाल कोश्यारी यांचे शिष्य म्हणविले जाणाऱ्या दोन तरुण नेत्यांना अनुक्रमे उत्तराखंड व केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी पदे मिळाली. कोश्यारी हे मंत्री, मुख्यमंत्री असताना त्यांचे विशेषाधिकारी राहिलेले पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे मुख्यमंत्री बनले तर नैनितालचे खासदार अजय भट्ट यांचा बुधवारी सायंकाळी केंद्रीय मंत्री म्हणून शपथविधी झाला. सोबतच त्या राज्याच्या राजकारणात कोश्यारी यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना राजीनामा द्यावा लागला.

२००० मध्ये उत्तर प्रदेशच्या विभाजनानंतर उत्तराखंड हे नवे राज्य बनले. त्याआधीच विद्यार्थीदशेतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राहिलेले भगतसिंह कोश्यारी हे उत्तर प्रदेश विधान परिषदेचे सदस्य होते. नित्यानंद स्वामी यांच्या नेतृत्वातील उत्तराखंडच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते ऊर्जामंत्री होते तर वर्षभरातच ते मुख्यमंत्री बनले. तथापि, २००२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला व कोश्यारी यांच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद आले. त्यानंतर पाच वर्षांनी भाजप सत्तेवर आला तेव्हा मात्र त्यांच्याऐवजी बी. सी. खंडुरी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

यानंतर कोश्यारी आधी राज्यसभेचे व नंतर लोकसभेचे सदस्य राहिले. विधिमंडळ व संसदेच्या दोन्ही सदनांचे सदस्य बनण्याची आगळी कामगिरी त्यांच्या नावाने नोंदविली गेली. सप्टेंबर २०१९ पासून ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत व त्यांच्या या संसदीय अनुभवाचे दर्शन गेले पावणेदोन वर्षे महाराष्ट्राला होत आहे. रा. स्व. संघाशी, तसेच नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळेच उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदापासून ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेररचनेत त्यांच्या शब्दाला मान असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते आहे.

------------------------