शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ई-कॉमर्स पॉलिसी लवकरच लागू करा; कॅटची पीयूष गोयल यांच्याकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:18 IST

भविष्यात इंटरनेट उपयोगकर्त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्सचे मार्केट मोठे होणार आहे. याकरिताच विशेष नियमांतर्गत ई-कॉमर्स पॉलिसीची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकलवर व्होकल आणि आत्मनिर्भर भारताचे आवाहन केले असून ते ई-कॉमर्स व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. देशातील ई-कॉमर्स बाजाराला मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांनी चुकीच्या व्यावसायिक पद्धतींनी संकटात टाकले आहे. ई-कॉमर्सच्या कंपन्यांच्या माध्यमातून लोकांची खरेदी वाढली आहे. अशा परिस्थितीत भारतातील लहान व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ई-कॉमर्स पॉलिसीची लवकरच घोषणा करावी, अशी मागणी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केली आहे.

भारतात ८ कोटींपेक्षा जास्त लहान व्यावसायिक आहेत. कोरोना महामारीमुळे १.५० कोटींपेक्षा जास्त व्यावसायिकांवर शोरूम वा दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. त्यातच मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या लोकांना जास्त सवलतीत वस्तू देत असल्याने त्याचेही संकट व्यापाऱ्यांवर आले आहे. ई-कॉमर्सचा वाढता प्रभाव पाहता कॅटने व्यापाऱ्यांवरील संकट दूर करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये ई-कॉमर्स पोर्टल भारत या ई-मार्केटला लॉन्च करण्याची तयारी केली आहे. याचा फायदा दुकानदारांना होणार आहे. कॅटने ई-कॉमर्स धोरणासह ई-कॉमर्स व्यवसायाचे संचालन सुरळीत होण्यासाठी एक ई-कॉमर्स नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना करण्याची मागणी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या अंतर्गत ई-कॉमर्स धोरणाचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर दंड आकारण्याचे सुचविले आहे. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांना एफडीए धोरणात कोणतीही सूट देण्याची आवश्यकता नाही. एफडीए नियमांचे सक्तीने पालन करावे, असे बंधन या कंपन्यांवर टाकावे. ई-कॉमर्स पॉलिसी आली तर देशात सर्व कंपन्यांमध्ये स्पर्धा राहील.कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया म्हणाले, ई-कॉमर्स देशाचे भविष्य आहे. लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच नियमांचे पालन करण्यासाठी ई-कॉमर्स पॉलिसीची गरज आहे. कोरोना महामारीपूर्वी ई-कॉमर्सचा व्यवसाय ६ टक्के होता, तो सध्या २४ टक्क्यांवर गेला आहे. शहरी भागातील ४२ टक्के इंटरनेट उपयोगकर्ते आता ई-कॉमर्सच्या माध्यमातून खरेदी करीत आहेत. अशा स्थितीतही देशातील दुकाने आपली भूमिका महत्त्वपूर्ण बजावत राहतील, पण त्यांना प्रोत्साहनपर धोरणांची गरज आहे. भारतात ई-कॉमर्स बाजार २०२६ पर्यंत २०० बिलियन डॉलरवर जाण्याची शक्यता आहे. तो सध्या ४५ बिलियन डॉलर आहे. देशात इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे ६८७ दशलक्ष डिजिटल उपयोगकर्ते आहेत. त्यापैकी ७४ टक्के ई-कॉमर्स व्यवसायात सक्रिय आहेत. भविष्यात इंटरनेट उपयोगकर्त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे ई-कॉमर्सचे मार्केट मोठे होणार आहे. याकरिताच विशेष नियमांतर्गत ई-कॉमर्स पॉलिसीची गरज असल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :businessव्यवसाय