शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाव लोकमतचा : नागपुरातील ध्रुव पॅथॉलॉजीला ५ लाख रुपयांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 21:12 IST

कोविड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याने शहरातील रामदासपेठ येथील ध्रुव लॅबवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड संदर्भात आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याने शहरातील रामदासपेठ येथील ध्रुव लॅबवर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत लॅबमध्ये तपासणीचे काम आवश्यक पूर्तता होईपर्यंत स्थगित करण्याचे निर्देश दिले. मंगळवारी आयुक्तांनी साथ रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत ही कारवाई केली आहे.सुविश्वास लॅब रामदासपेठ आणि मेट्रो लॅब धंतोली यांनाही मनपाने ताकीद दिली आहे. ऑनलाईन नोंदणीमध्ये तफावत, चाचणीची रियल टाईम नोंद नसणे याशिवाय बरेच अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित असल्याची बाब लक्षात येताच मनपातर्फे नोटीसची कारवाई करण्यात आली होती. विशेष म्हणजे कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करणाऱ्या खासगी लॅब ३० ते ४० तासांचा कालावधी लावत असल्याचे ‘लोकमत’ने उघडकीस आणले होते.अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांच्या नेतृत्वात पथकाने मनपाद्वारे कोविड चाचणीची परवानगी देण्यात आलेल्या पॅथॉलॉजीची पाहणी केली. यामध्ये ध्रुव पॅथॉलॉजी, सुविश्वास लॅब आणि मेट्रो लॅबमध्ये आय.सी.एम.आर.च्या दिशानिर्देशानुसार एकूण चाचण्या व त्यानुसार करावयाच्या आॅनलाईन नोंदीमध्ये तफावत आढळून आली. यासोबतच लॅबमध्ये होणाºया कोविड चाचणीची रियल टाईम नोंद होणे आवश्यक असताना लॅबमध्ये नोंद न करता अहवाल नोंदणीचे निरीक्षण न करता प्रलंबित ठेवल्याचे पथकाला निदर्शनास आले.ध्रुव पॅथॉलॉजीने वेळेवर माहिती दिली नाहीध्रुव पॅथॉलॉजी महापालिकेच्या आरोग्य विभागाला पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती वेळेवर देत नाही. ५, ६ आणि ७ सप्टेंबरला १ हजार ४०७ रुग्णांची तपासणी करण्यात आली. परंतु फक्त ५७१ रुग्णांची माहिती मनपाला देण्यात आली आणि ८३६ रुग्णांबद्दल माहिती दिलीच नाही. असे निदर्शनास आले. संजय निपाने आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी आयुक्तांच्या परवानगीने ही कारवाई केली. त्यांनी प्रयोगशाळाला आई.सी.एम.आर. निर्देशाप्रमाणे पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती मनपाला देण्याचे निर्देश दिले. तसेच मेट्रो लॅब आणि सुविश्वास लॅबला ताकिद देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका