शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बांधकाम साहित्यांच्या दरवाढीचा बांधकामावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 21:53 IST

बांधकाम साहित्यांचे दर वाढल्यामुळे लोकांना घर खरेदी आवाक्याबाहेर होणार आहे. सहा महिन्यात रेतीचे भाव दीडपटीने वाढले आहेत. सध्या ४०० क्युबिक फूट रेती २० हजारांवर गेली आहे. तर विटा ६०० ते ७०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्या तुलनेत लोखंडाच्या किमती ४५ रुपयांवरून ३८ रुपयांपर्यंत कमी झाल्यामुळे बिल्डरांना दिलासा मिळाला आहे. पण विटा आणि रेतीच्या दरवाढीमुळे बांधकामावर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देविटा व रेती महाग : रेडी पजेशन फ्लॅटला मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बांधकाम साहित्यांचे दर वाढल्यामुळे लोकांना घर खरेदी आवाक्याबाहेर होणार आहे. सहा महिन्यात रेतीचे भाव दीडपटीने वाढले आहेत. सध्या ४०० क्युबिक फूट रेती २० हजारांवर गेली आहे. तर विटा ६०० ते ७०० रुपयांनी वाढल्या आहेत. त्या तुलनेत लोखंडाच्या किमती ४५ रुपयांवरून ३८ रुपयांपर्यंत कमी झाल्यामुळे बिल्डरांना दिलासा मिळाला आहे. पण विटा आणि रेतीच्या दरवाढीमुळे बांधकामावर परिणाम झाला आहे.रेतीचा लिलाव नाहीशासनाने अजूनही रेती घाटाचा लिलाव सुरू केलेला नाही. शिवाय अवैध मार्गाने शहरात येणाऱ्या रेतीच्या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केल्यामुळे विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे सहा महिन्यांच्या कालावधीत रेतीचे दर १२ हजारांवरून २० हजारांवर पोहोचले आहे. मध्य प्रदेशातून रेतीची आवक सुरू आहे. पण भाडे आणि रॉयल्टीमुळे दर वाढले आहेत. याशिवाय बाजारात मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध नसल्यामुळे दर आणखी वाढल्याची शक्यता आहे. बांधकाम साहित्यांचे विक्रेते विजय डोर्लीकर यांनी सांगितले.विटांची दरवाढजवळपास एक महिन्यात एक हजार विटांमागे ५०० ते ६०० रुपयांची वाढ झाली आहे. कामठी आणि कोराडी येथून येणाºया विटांची किंमत ४८०० रुपये तर रामटेक आणि देवलापार येथील विटांची किंमत ५५०० रुपये आहे. पुढे दर कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय गिट्टीचे दर थोड्याफार प्रमाणात वाढले आहेत. २०० क्युबिक फूटसाठी ५२०० रुपये मोजावे लागत आहेत. अनेक ठिकाणी बांधकाम बंद असल्यामुळे उठाव कमी आहे.मजुरांची वानवानागपुरातील बांधकाम क्षेत्रात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथील सर्वाधिक मजूर काम करतात. पण दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका असल्यामुळे ८० टक्के मजूर आपल्या राज्यात परत गेले आहेत. निवडणुका संपल्यानंतरच ते परत बांधकामावर रूजू होतील, असे बांधकाम क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.चार महिन्यांपासून विक्री वाढलीगेल्या चार महिन्यांपासून फ्लॅटची विक्री वाढली आहे. रेडी पजेशनला जास्त मागणी आहे. बँकेतून कमी व्याजदरात कर्ज मिळत आहेत. आकडेवारीनुसार बँकेच्या केसेस वाढल्या आहेत. काही बांधकाम साहित्यांचे दर वाढले आहेत तर जीएसटीमुळे काहींचे कमी झाले आहेत. किराया देणारे रेडी पजेशन फ्लॅट खरेदीस उत्सुक आहेत.गौरव अगरवाला, बिल्डरशासनाच्या सोबतीने बांधकाम करापुणेच्या तुलनेत नागपुरात जमीन आणि फ्लॅटचे दर जास्त आहेत. पुणे येथे शासनाने प्रारंभी पायाभूत सुविधा उभारल्या त्यानंतरच बिल्डर्सने प्रकल्प उभारले. त्याचा फायदा ग्राहक, बिल्डर्स आणि शासनाला झाला. याउलट नागपुरात प्रारंभी प्रकल्प उभारले जातात, त्यानंतरच पायाभूत सुविधा तयार होतात. शासनाच्या सोबतीने बांधकाम झाले पाहिजे. जास्त प्रकल्प आणि उलाढाल असल्यास बांधकाम साहित्यांचे दरही कमी होतील. देशाची आर्थिक स्थिती पाहिल्यास लोकांचे उत्पन्न कमी आहे. बँकांमधून कर्ज घेऊन ते किती वर्ष फेडायचे, हा गंभीर प्रश्न आहे. चार ते पाच वर्षांत कर्ज फेडले जावे. पूर्वी बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी स्वप्न विकण्याचे काम केले. त्याचा परिणाम आता दिसत आहे. लोक तपासून खरेदी करीत आहेत. नागपुरातही उत्तम पायाभूत सुविधा आहेत. बिल्डर्सचे भविष्य चांगले आहे.अशोक मोखा, आर्किटेक्ट

 

टॅग्स :infiltrationघुसखोरीsandवाळू