शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या मेसेजची पालकमंत्र्यांकडून तत्काळ दखल

By admin | Updated: October 1, 2015 03:22 IST

मंगळवार रात्री सुमारे ११ ची वेळ. मौद्यातील एक शेतकऱ्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मोबाईलवर मेसेज केला. साहेब... करपा रोगाने धान उत्पादक शेतकरी त्रस्त आहे.

जिल्हा प्रशासनाने घेतला आढावा : करपा, कडाकरपा रोगावर सुचविले उपायनागपूर : मंगळवार रात्री सुमारे ११ ची वेळ. मौद्यातील एक शेतकऱ्याने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मोबाईलवर मेसेज केला. साहेब... करपा रोगाने धान उत्पादक शेतकरी त्रस्त आहे. याकडे मुख्यमंत्री साहेबांचे लक्ष वेधा. व्यस्त असलेल्या संवेदनशील पालकमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या या मेसेजची तत्काळ दखल घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून याचा आढावा घेण्याचे व शेतकऱ्यांना उपाय सुचविण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासनानेही गतिमानता दाखविली. बुधवारी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली व करपा, कडाकरपा रोगावर काय उपाय योजता येतील, याची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध केली. गोपाल चौक, मौदा येथील शेतकरी राहुल हटवार यांनी मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास पालकमंत्री बावनकुळे यांना मेसेज केला. या मेसेजमध्ये त्यांनी नमूद केले की, मौदा तालुक्यातील धान पिकावर करपा, कडाकरपा या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधावे. यावर उपाय योजण्याची त्यांना विनंती करावी व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून वाचवावे. शेतकऱ्यांच्या या लढ्यात आपणही सहभागी व्हावी, अशी कळकळीची विनंती संबंधित शेतकऱ्याने मेसेजमध्ये केली होती. हा मेसेज वाचून पालकमंत्री बावनकुळे चिंतातूर झाले. मात्र, दुसऱ्याच क्षणाला वेळ न घालवता रात्रीच त्यांनी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना फोन केला व धान पिकावर आलेल्या रोगाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना उपाय सुचविण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनीही गतिमान प्रशासनाची पावती देत बुधवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील मौदा, पारशिवनी, रामटेक, कामठी, भिवापूर, उमरेड, कुही या तालुक्यातील धान उत्पादक भागात धानावर करपा आणि कडाकरपा या दोन रोगांचा प्रादुर्भाव कृषी विभागाने केलेल्या पाहणीत आढळून आल्याची माहिती समोर आली. याची दखल घेत पुढील काही दिवस धान पिकावर लक्ष ठेवून राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कुर्वे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीनंतर करपा, कडाकरपा रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध केली. (प्रतिनिधी)