शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्यात तात्काळ सुधारणा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:16 IST

दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच विद्युत सुधारणांसाठी १२८.५५ कोटींचा विशेष विकास निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे निर्देश : दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील विकास कामांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील पिण्याचे पाणी, स्वच्छता तसेच विद्युत सुधारणांसाठी १२८.५५ कोटींचा विशेष विकास निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यातून विकास कामे करताना पिण्याच्या पाणीपुरवठ्यात तात्काळ सुधारणा करा. दिलेल्या वेळेनुसार नियमित पुरविण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.हैदराबाद हाऊस येथे दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. महापालिका, नासुप्र, वीज वितरण कंपनी तसेच महसूल आदी विभागांना विशेष निधी तसेच जिल्हा नियोजन मंडळातर्फे मंजूर कामे दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त अश्विन मुदगल, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, सभापती अविनाश ठाकरे, मुख्यमंत्री कार्यालयाच्या विशेष कार्याधिकारी आशा पठाण, शशांक दाभोळकर व नगरसेवक उपस्थित होते. दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रात महापालिकेतर्फे १२८.५५ कोटींची विकास कामे सुरू आहेत. मलवाहिका, पावसाळी नाली टाकणे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी आदी नागरी सुविधांची कामे येत्या वर्षभरात पूर्ण करा. जेथे पाणी उपलब्ध होत नाही अशा वस्त्यांची माहिती सादर करावी. यासंदर्भात स्वतंत्र बैठक घेऊन पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुनी झालेली पाईपलाईन बदलण्यासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. गरज भासल्यास आणखी १५ कोटी उपलब्ध करण्यात येईल. अमृत योजनेमधून नागरी सुविधा व पाणीपुरवठा उपलब्ध करा. गोरक्षण, राममंदिर तसेच रेणुकादेवी या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी प्रत्येकी दोन कोटी तसेच रेणुकादेवी मंदिरासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले आहे. क वर्ग तीर्थक्षेत्र विकासांतर्गत मूलभूत सुविधांसाठी तीन कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. सोनेगाव येथील ऐतिहासिक शिवमंदिर विकासाचा आराखडासुद्धा सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.नासुप्रतर्फे १३८ विकास कामे सुरू आहेत. यातील ११२ पूर्ण झालेली आहेत. मंजूर अभिन्यासातील २० कोटींची ४८ कामे पूर्ण झालेली आहेत. या भागात १०० कोटींची कामे प्रस्तावित आहेत. १३ कोटींची नवीन कामे सुचविण्यात आली आहेत.