शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्हेंडरला केली बेदम मारहाण ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये गुटखा विकणाऱ्या एका अवैध व्हेंडरवर गुन्हा दाखल करायचे सोडून त्यास बेदम मारहाण केल्याची घटना नागपूर ...

नागपूर : महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये गुटखा विकणाऱ्या एका अवैध व्हेंडरवर गुन्हा दाखल करायचे सोडून त्यास बेदम मारहाण केल्याची घटना नागपूर रेल्वेस्थानकावर घडली. ‘मला मारू नका, गुन्हा दाखल करा’अशी विनवणी करीत असतानाही आरपीएफने त्यास मारहाण करून गुन्हा दाखल न करताच सोडून दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सिद्धार्थ बाबाराव इंगळे (३६) रा. सोनेगाव, ता. कारंजा जि. वर्धा असे या अवैध व्हेंडरचे नाव आहे.

लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोर रडत रडत सिद्धार्थने सांगितले की, तो महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये गुटखा आणि पेपर सोप विकत होता. यापूर्वी तो रेल्वेगाड्यात चहा विकत होता. शनिवारी दुपारी १.३० वाजता वर्धा रेल्वेस्थानकावरून तो महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये चढला. नागपूर रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर त्यास रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी पकडले. काही विचारण्याच्या आतच त्यांनी या अवैध व्हेंडरला बेदम मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याला आरपीएफ ठाण्यात आणून पुन्हा पट्ट्याने मारहाण केल्याची माहिती या व्हेंडरने दिली. त्याचे शर्टही आरपीएफ जवानांनी फाडले. मला मारू नका, गुन्हा दाखल करा, अशी विनवणीही आपण केली. परंतु कुणीच ऐकायला तयार नसल्याचे त्याने सांगितले. डाव्या हाताला जबर मारहाण झाल्यामुळे हात उचलत नसून तो फ्रॅक्चर झाला असावा, असा अंदाजही त्याने व्यक्त केला. अवैध व्हेंडरला पकडल्यानंतर आरपीएफच्या वतीने रेल्वे अ‍ॅक्ट १४४ नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येते. परंतु या अवैध व्हेंडरला आरपीएफने बेदम मारहाण केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत आरपीएफचे निरीक्षक आर. एल. मीना यांना विचारणा केली असता, अशा कोणत्याच व्हेंडरला ठाण्यात आणले नाही आणि मारहाण केली नसल्याचे त्यांनी सांगितले. असे असेल तर सिद्धार्थ काहीच कारण नसताना आरपीएफवर आरोप का करीत होता, हा प्रश्न आहे. जर त्यास पोलिसांची भीती वाटत असती तर तो लोहमार्ग पोलीस ठाण्यात गेला नसता. तो अवैध व्हेंडर होता तर त्याला मारहाण न करता त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाऊ शकत होता. तो खोटे बोलत होता तर त्यास रेल्वेस्थानक परिसरात कसे थांबू देण्यात आले, हा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. लोहमार्ग पोलीस ठाण्यासमोरच एका आरपीएफ जवानासमोर सिद्धार्थ आरपीएफने केलेल्या मारहाणीबाबत ओरडत होता.

.................