लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : पाेलिसांच्या पथकाने बुटीबाेरी-उमरेड मार्गावर केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैघ वाहतूक करणारेे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. १५) सायंकाळी करण्यात आली.
आशिष राजेश साेनटक्के, रा. पवनार, जिल्हा वर्धा, शेख सलमान शेख नूर (२१, रा. पूल फैल, वर्धा) व इस्माईल अब्दुल हमीद शेख (४५, रा. पूल फैल, वर्धा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. बुटीबाेरी पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना बुटीबाेरी परिसरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी बुटीबाेरी-उमरेड मार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. यात त्यांनी एमएच-३२/बी-४१०८ क्रमांकाचे छाेटे मालवाहू वाहन थांबवून झडती घेतली. त्यात चार जनावरे काेंबली असल्याचे लक्षात येताच कागदपत्रांची तपासणी केली.
ती गुरांची अवैध वाहतूक असल्याचे तसेच ती जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच वाहनातील तिघांना अटक केली आणि गुरांची सुटका करून वाहन जप्त केले. या कारवाईमध्ये दाेन लाख रुपये किमतीचे वाहन आणि ६० हजार रुपये किमतीची चार जनावरे असा एकूण २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार ओमप्रकाश काेकाटे यांनी दिली. या गुरांना नजीकच्या गाेशाळेत पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक फाैजदार संजय खंडारे, ठाकूर यांच्या पथकाने केली.