शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

पाच वर्षांत साडेपाच लाखावर वृक्षांची अवैध तोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2018 12:06 IST

मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.

ठळक मुद्दे३४ कोटी ५६ लाखांचे नुकसान२ लाख ३४ हजार सागवान वृक्षांचाही समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृक्ष लागवड ही राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. वृक्ष लागवडीच्या अभियानाचे सर्वत्र कौतुकही केले जात आहे. जंगल क्षेत्र वाढत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु दुसरीकडे जंगलात अवैध वृक्षतोडही मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची बाब माहितीच्या अधिकारांतर्गत उघडकीस आली आहे. मागील पाच वर्षांत तब्बल ५ लाख ६१ हजार ४१० वृक्षांची अवैधपणे तोड करण्यात आली असून, यामध्ये २ लाख ३४ हजार २१६ सागवान वृक्षांचा समवेश आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी यासंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागविली. त्यावर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) महाराष्ट्र नागपूर यांच्या कार्यालयाने दिलेली माहिती धक्कादायक आहे. २०१३ ते मार्च २०१८ यादरम्यान एकूण ५ लाख ६१ हजार ४१० वृक्ष अवैधपणे तोडण्याची आली आहे. यापैकी एकट्या सागवनाची झाडे २ लाख ३४ हजार २१६ इतकी आहेत. वर्षनिहाय विचार केल्यास २०१३ मध्ये एकूण १ लाख ३९ हजार ५६ झाडांची अवैध कटाई झाली. यात सागवान झाडांची संख्या ५४ हजार ४२९ इतकी होती. २०१४ मध्ये एकूण १ लाख २० हजार ५५१ झाडे तोडली गेली. यात ४७ हजार ९३५ सागवानांची झाडे होती. २०१५ मध्ये १ लाख ३ हजार ४१४ झाडे यात ४२ हजार ८०६ सागवानांची झाडे, २०१६ मध्ये ९६ हजार ६२६ झाडे यात ४२ हजार ७२६ सागवान झाडे तर २०१७ मध्ये ८० हजार ६७९ झाडे तोडण्यात आली. यात ३९ हजार ९७९ सागवानाच्या झाडांचा समावेश आहे. या पाच वर्षांत एकूण ३४ कोटी ५६ लाख ८५ हजार रुपये किमतीची ही झाडे आहेत.यामध्ये एकट्या सागवान झाडांची किंमत २५ कोटी ९५ लाख इतकी आहे.

तीन महिन्यात २०,५५४ झाडे तोडली२०१८ मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत तब्बल २०,५५४ झाडे तोडण्यात आली. यामध्ये १०,३४१ झाडे ही सागवानाची आहेत. म्हणजे तीन महिन्यातच दीड कोटी रुपये किमतीची झाडे तोडली गेली. यात एकट्या सागवान झाडांची किंमतच सव्वा कोटीच्या जवळपास आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग