शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीरच्या खोऱ्यात लपलेत 'हायब्रिड दहशतवादी', शोपियानमधून दोघांना अटक, एके-५६ सहित दारुगोळा जप्त!
2
देशातील ४९ जिल्ह्यांत जन्मदरापेक्षा मृत्यूदर अधिक, भारताची लोकसंख्या घटण्याच्या मार्गावर? 
3
पुणेकरांनो सावध व्हा...! AI थेट पावती फाडणार; मागचा पुढचा विचार सोडा... वाहतूक नियम पाळा...
4
लश्कर ए तोयबानं पाडलं बांगलादेशातील शेख हसीना सरकार?; आता भारताला दिली धमकी
5
वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या
6
Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट
7
Airtel नं आणले ३ नवे रिचार्ज प्लान्स, कमी किंमतीत अनलिमिटेड बेनिफट्स; OTT चाही मोफत लाभ
8
Video - बापरे! रीलच्या नादात ट्रेनच्या दरवाजाला लटकत होती तरुणी, अचानक हात सुटला अन्...
9
Google ने भारतात सुरू केले अधिकृत स्टोअर; Pixel फोन्सवर मिळतोय ₹42000 चा डिस्काउंट
10
एक कांदा ८०० ग्रॅम ते १ किलो वजनाचा! नितीन गडकरींच्या पत्नीने केला अनोखा प्रयोग; भरघोस उत्पादन आले...
11
IPL 2025 Playoffs Rules: पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलला कोणता संघ जाणार? जाणून घ्या नियम
12
"आता गांधीजींचा देशही दुसरा गाल पुढे करणार नाही, तर…’’, शशी थरूर यांनी ठणकावले   
13
MI संघातील 'हा' खेळाडू साकारु शकेल 'बाबूभैय्या', हरभजन सिंगची 'हेरा फेरी'वादावर मजेशीर टिप्पणी
14
'बंटी और बबली' सिनेमासाठी अभिषेक बच्चनला नव्हती पहिली पसंती, या अभिनेत्याची केलेली निवड, पण...
15
सोनं झालं स्वस्त! आज मोठी घसरण, खरेदीची 'सुवर्णसंधी' की अजून वाट पाहाल? नवे दर काय?
16
इंग्रजीच्या शिक्षकाने घेतला जीवघेणा बदला; लग्नाचं गिफ्ट म्हणून पाठवले 'मृत्यूचं पार्सल', मग...
17
Crime News : मधुचंद्राच्या रात्री पत्नी बघत होती वाट,पती तिच्याच बहिणीला घेऊन झाला पसार!
18
Netflix, Amazon Prime बाबत दोन महत्त्वाच्या अपडेट, लवकरच या डिव्हाईसेसवर काम करणं होणार बंद
19
"एका हाताने टाळी वाजत नाही..."; बलात्कार प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?
20
“वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी फाशीवरचं लटकायला हवेत”, भाजपा आमदाराचा संताप

सरकारी वकील संस्थेला अवैधपणे भूखंडांचे वाटप

By admin | Updated: February 4, 2016 03:00 IST

नियोजित सरकारी वकील आणि विधी व न्याय विभाग नागपूर गृहनिर्माण सहकारी संस्थेला मौजा जरीपटका व मौजा बोरगाव येथील यूएलसी भूखंड देण्यात आले आहेत.

हायकोर्ट करणार सुनावणी : अधिकाऱ्यांवर कारवाईची शक्यतानागपूर : नियोजित सरकारी वकील आणि विधी व न्याय विभाग नागपूर गृहनिर्माण सहकारी संस्थेला मौजा जरीपटका व मौजा बोरगाव येथील यूएलसी भूखंड देण्यात आले आहेत. हे वाटप अवैधपणे झाले असल्याचे आढळून आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी या भूखंडांसंदर्भातील कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर हे प्रकरण सुनावणीसाठी प्रलंबित ठेवले. तसेच, या गैरव्यवहारात लिप्त अधिकाऱ्यांवर काय कारवाई करावी, याविषयी वकिलांना पुढच्या सुनावणीत युक्तिवाद करण्यास सांगितले.यूएलसी जमीन वाटप घोटाळ्यासंदर्भात माजी आमदार सुनील शिंदे यांनी रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. के. बट्टा यांचा आयोग स्थापन केला होता.आयोगाने चौकशी करून एकूण ९९ प्रकरणात यूएलसी भूखंडांच्या वाटपावर आक्षेप घेतला आहे. न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांचे विशेष न्यायपीठ या प्रकरणांवर क्रमानुसार सुनावणी घेत आहे. बुधवारी नियोजित सरकारी वकील आणि विधी व न्याय विभाग नागपूर गृहनिर्माण सहकारी संस्था, विदर्भ मुलकी सेवा (उपजिल्हाधिकारी) संघटना, भाग्यश्री गृहनिर्माण सहकारी संस्था, वसंतदादा पाटील स्मृती प्रतिष्ठान व जयंती ज्योती मूक-बधीर शाळा यांना करण्यात आलेल्या भूखंड वाटपावर सुनावणी झाली. सरकारी वकील संस्थेला झालेले वाटप अवैध आढळून आल्यामुळे हे प्रकरण दीर्घ सुनावणीसाठी मागे ठेवण्यात आले. वसंतदादा पाटील स्मृती प्रतिष्ठानला वाठोडा, द्रुगधामना व चिचभवन येथे भूखंड देण्यात आले आहेत. या भूखंडांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती दोन आठवड्यात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने शासनास दिले आहेत. तसेच, इतर प्रकरणांत भूखंडांचा ताबा शासनाकडेच आहे. यामुळे त्यात पुढील चौकशीची गरज नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अ‍ॅड. आनंद परचुरे, मुख्य सरकारी वकील भारती डांगरे, अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर व अ‍ॅड. सतीश उके यांनी संबंधित पक्षकारांतर्फे बाजू मांडली. (प्रतिनिधी)