शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयआयएम मिहानमध्येच

By admin | Updated: February 25, 2015 02:41 IST

नागपूर येथील मिहान प्रकल्पात ‘मेट्रो रेल्वे ’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी ३७ हेक्टर तर इंडियन इन्स्ट्यिूट आॅफ मॅनेजमेंटसाठी (आयआयएम) २०० एकर जागा देण्याच्या निर्णयावर...

नागपूर: नागपूर येथील मिहान प्रकल्पात ‘मेट्रो रेल्वे ’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी ३७ हेक्टर तर इंडियन इन्स्ट्यिूट आॅफ मॅनेजमेंटसाठी (आयआयएम) २०० एकर जागा देण्याच्या निर्णयावर मंगळवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.आयआयएम आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जागा देण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले होते. मंगळवारी मिहानच्या आढावा बैठकीत दोन्ही प्रस्तावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे मिहानमधील २०० एकर जागेवर आयआयएम साकारणार असून मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी ३७ हेक्टर जागा मिळणार आहे. भविष्याची गरज लक्षात घेता उच्च शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्थांना सवलतीच्या दरात जागा देण्याच्या सूचनाही यावेळी फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. मिहानमध्ये दर्जेदार शिक्षण देणारी शाळा सुरू करावी तसेच या शाळांमध्ये प्रकल्पबाधितांच्या मुलांना प्रवेश द्यावा, असेही ठरले. मिहान प्रकल्पासाठी कुठल्याही परिस्थितीत चढ्या दराने वीज घेणार नाही,असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)