शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक प्रशासनाकडून संक्रमण टाळता यावे म्हणून लसीकरणावर भर दिला जातो आहे. महापालिकेने ...

नागपूर : कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक प्रशासनाकडून संक्रमण टाळता यावे म्हणून लसीकरणावर भर दिला जातो आहे. महापालिकेने तर लसीकरण अभियानदेखील राबविले आहे. पण या अभियानात दिव्यांगांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी प्रशासनासोबत काम करणाऱ्या संस्थांनीही दिव्यांगांच्या लसीकरणाकडे पाठ फिरविली आहे.

नागपूर महापालिकेतर्फे लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. यात रिक्षा व ऑटो ड्रायव्हर, ट्रान्सपोर्ट, डिलिव्हरी बॉय, फळ विक्रेता, लेबर, हॉकर्स, हॉटेल कर्मचारी, फार्मासिस्ट आदींचे लसीकरण करण्यात येणार आहे. परंतु दिव्यांग बांधवांना यात उपेक्षित ठेवण्यात आले आहे. या अभियानात दिव्यांग बांधवांसाठी कुठलाही विशेष दिवस नाही, विशेष व्यवस्था नाही. दिव्यांगांना लसीकरण आवश्यक असतानाही अभियान राबविणारे दिव्यांगांपर्यंत पोहचत नाही. दिव्यांगांना सामान्यापेक्षा कोरोना संक्रमणाची शक्यता जास्त असते. त्यांना चालताना, उठता-बसताना सहकार्य घ्यावे लागते. त्यामुळे दिव्यांगांना संक्रमणाचा धोका जास्त असतो. त्यामुळे दिव्यांग बांधवांनाही लसीकरण अभियानात सहभागी करून घ्यावे, त्यांच्यासाठी लसीकरणाची स्वतंत्र सोय करण्यात यावी, अशी मागणी डिसेबिलिटी राईट्स अ‍ॅक्टिव्हिस्ट वर्मा तेलंग यांनी केली आहे. ४५ वर्षांवरील दिव्यांगांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ते लसीकरण केंद्रावर येऊ शकत नसेल तर त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी राष्ट्रीय विकलांग कल्याण संस्थाचे अध्यक्ष त्र्यंबक मोकासरे यांनी केली आहे.

ज्या संस्था दिव्यांगांसाठी काम करतात, त्यांनी प्रशासनाला दिव्यांगांच्या अवस्थेची जाणीव करून देत प्रशासनाला लसीकरणासाठी बाध्य करावे, अशीही मागणी दिव्यांग बांधवांकडून होत आहे.