शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

आयएफएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: February 5, 2017 02:22 IST

राज्य शासनाने वन विभागातील नऊ आयएफएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी केले आहेत.

नऊ अधिकाऱ्यांचा समावेश : उमेश अग्रवाल एफडीसीएमचे नवे एमडी नागपूर : राज्य शासनाने वन विभागातील नऊ आयएफएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी केले आहेत. यात काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे तर काहींची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या बदली आदेशानुसार महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे (एफडीसीएम) मुख्य महाव्यवस्थापक उमेश अग्रवाल यांची येथेच व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदोन्नतीसह नियुक्ती करण्यात आली आहे. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) डॉ. विनय सिन्हा यांना महाराष्ट्र राज्य जैवविविध मंडळावर सदस्य सचिव म्हणून पाठविण्यात आले आहे. शिवाय अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) के. एन. खवारे यांची प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) येथे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. पी. एन. मुंडे यांची महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे मुख्य महाव्यवस्थापक म्हणून, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) बी. पी. सिंग यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) येथे, एफडीसीएमचे महाव्यवस्थापक आर. एस. यादव यांची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण) येथे, मुख्य वनसंरक्षक (वनसंवर्धन) अरविंद पाटील यांची मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर येथे आणि वनसंरक्षक सामाजिक वनीकरण, पुणे एम. एम. कुलकर्णी यांची मुख्य वनसंरक्षक (कार्य आयोजना) पुणे, येथे बदली करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)