शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘हार्टअटॅक’ आल्यास वेळेचे, दिवसाचे भान ठेवा!; नागपूर मेडिकलचा अजब फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 12:04 IST

Nagpur News तंत्रज्ञ नसल्याचे कारण पुढे करून रविवारसह इतर सुटीच्या दिवशी व रात्री ८ नंतर नागपूर मेडिकलमध्ये ईसीजी बंद ठेवण्याचा अजब निर्णय विभागाने घेतला आहे.

ठळक मुद्दे सुटीच्या दिवशी व रात्रीच्या वेळी ईसीजी बंद

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : छातीत दुखत असेल, हृदयविकाराचा झटका आला असेल आणि मेडिकलमध्ये उपचारासाठी जात असाल तर तुम्हाला वेळेचे व दिवसाचे भान ठेवण्याची गरज असल्याचा अजब फतवा औषधवैद्यकशास्त्र विभागाने काढला आहे. तंत्रज्ञ नसल्याचे कारण पुढे करून रविवारसह इतर सुटीच्या दिवशी व रात्री ८ नंतर ईसीजी बंद ठेवण्याचा अजब निर्णय विभागाने घेतला आहे.

‘ईसीजी’ म्हणजे, इलेक्ट्रो कार्डियोग्राम. हृदयाच्या रक्तभिसरण प्रक्रियेत (पंपिंग) हृदय बंद सुरू होण्यास ‘इलेक्ट्रिकल-अ‍ॅक्टिव्हिटी’ कारणीभूत असते. ईसीजी चाचणीद्वारे हृदयाच्या या इलेक्ट्रिकल अ‍ॅक्टिव्हिटीची नोंद होऊन त्याचा आलेख तयार होतो. यातून हृदयाची गतीची नियमितता व अनियमितता कळते. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यास ईसीजीमध्ये बदल होतात आणि त्यावरून ‘हार्टअटॅक’, हृदयाला झालेली हानी किंवा हृदयाचा कप्प्यांचा वाढलेला आकार याचे निदान होते. रुग्णसेवेत हे यंत्र महत्त्वपूर्ण मानले जाते. मात्र, विदर्भासह आजूबाजूच्या राज्यांतील रुग्णांचा भार असलेल्या मेडिकलमध्ये तंत्रज्ञ नसल्याचे कारण देऊन रुग्णांना वेठीस धरले जात आहे.

-ईसीजीची वेळ दुपारी २ ते ८ वाजेपर्यंतच

मेडिकलच्या ईसीजी कक्षाच्या दारावर रविवारच्या दिवशी व इतर दिवशी केवळ दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंतच ईसीजी सुरू राहील, असा फलक लावण्यात आला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी किंवा सुटीच्या दिवशी हृदयविकाराचे रुग्ण अडचणीत येण्याची शक्यता आहे.

-तंत्रज्ञ नसल्याचे दिले कारण

औषधवैद्यकशास्त्र विभागाने ईसीजी बंद ठेवण्याच्या कारणाचे पत्रही कक्षाच्या दारावर लावले आहे. यात ‘ईसीजी’ तंत्रज्ञानाची कमतरता असल्यामुळे हा विभाग चालविणे शक्य नाही असे म्हटले आहे. सोबतच ईसीजी विभाग रात्रपाळीत, शासकीय सुटीच्या दिवशी व रविवारी बंद राहणार असल्याचाही उल्लेख आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय