शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

प्रामाणिक आहात तर, पाच लाख जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 20:45 IST

गोसेखुर्द धरणातील गाळ व रेती काढण्याच्या कंत्राटाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील व्यवस्थापक कार्यालयात पाच लाख रुपये जमा करण्याचा आदेश मंगळवारी देण्यात आला. याकरिता याचिकाकर्त्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. ही रक्कम जमा केल्यानंतरच प्रकरणावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देहायकोर्टाचा याचिकाकर्त्याला आदेश : १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द धरणातील गाळ व रेती काढण्याच्या कंत्राटाला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्याला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील व्यवस्थापक कार्यालयात पाच लाख रुपये जमा करण्याचा आदेश मंगळवारी देण्यात आला. याकरिता याचिकाकर्त्याला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली. ही रक्कम जमा केल्यानंतरच प्रकरणावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. नरेश डहारे असे याचिकाकर्त्याचे नाव असून, ते भंडारा जिल्हा परिषद सदस्य आहेत. या प्रकरणात न्यायालयाने गेल्या ३० जानेवारी रोजी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून एक आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले होते. तसेच, केवळ निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा देऊन पुढील निर्देशापर्यंत कंत्राटाचा कार्यादेश जारी करण्यास मनाई केली होती. त्यानंतर याचिकाकर्त्याच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे न्यायालयाने मंगळवारी त्यांना पाच लाख रुपये जमा करण्यास सांगितले.सिंचन प्रकल्पाची क्षमता टिकवून ठेवण्यासाठी पाण्यातील गाळ व रेती काढणे आवश्यक असते. त्याकरिता प्रकल्पात गाळ व रेती किती आहे, याचा अभ्यास व्हायला पाहिजे. परंतु, गोसेखुर्दच्या बाबतीत मनमानीपणे कृती केली जात आहे. गोसेखुर्द धरणातून २ कोटी १ लाख ७१ हजार ७१८ ब्रास गाळ व ५४ लाख ७२ हजार ४६५ ब्रास रेती निघणार असल्याचा दावा महामंडळाने केला असून, त्याला काहीच आधार नाही. तसेच महामंडळाने निविदा नोटीस जारी करण्यापूर्वी पर्यावरणविषयक परवानगी घेतल्या नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. माधव लाखे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प