शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण नाकारल्यास सत्तेतून खाली खेचू

By admin | Updated: December 9, 2015 03:32 IST

भारतीय राज्य घटनेत धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले.

धनगर समाज संघर्ष समितीचा इशारा : येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोषनागपूर : भारतीय राज्य घटनेत धनगर समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित केले. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मागील ६५ वर्षांपासून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निवडणूक जाहीरनाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा समाविष्ट केला. धनगर समाजाने भाजपाला भरघोस मतदान करून सत्तेत बसविले. परंतु वर्ष होऊनही भाजप सरकार आरक्षण देण्यास तयार नाही. त्यामुळे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत असेल तर सरकारला सत्तेतून खाली खेचू, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीत सहभागी नेत्यांनी दिला. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने हजारो धनगर समाजबांधवांचा मोर्चा विधानभवनावर काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी केले. हा मोर्चा टेकडी रोड मार्गावर पोलिसांनी अडवून धरला. त्यानंतर मोर्चात सहभागी मान्यवरांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी बोलताना डॉ. विकास महात्मे यांनी भाजप सरकारने लेखी दिलेले आश्वासन पाळले नसल्याचे सांगून आरक्षण नसल्यामुळे मागील ६० वर्षात धनगर समाजाची पिछेहाट झाली. समाजातील तरुण उच्चपदस्थ नोकऱ्यांवर जाऊ शकले नसल्याची खंत व्यक्त केली. सत्तेत बसलेल्या भाजप सरकारने धनगर समाजाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी आमदार प्रकाश शेंडगे, मंगेश गुलवाडे, शशिकांत तरंगे, प्रा. विजय सोनजे, रामेश्वर पाटील आदी मान्यवरांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सायंकाळी उशिरापर्यंत एकाही मंत्र्याने मोर्चाला भेट दिली नाही. मोर्चाला मुख्यमंत्र्यांनी सामोरे जाण्याचा आग्रह मोर्चात सहभागी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला. मोर्चातील पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ कॅबिनेट मंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यानंतर मंत्री महोदय मोर्चास्थळी भेट देणार असल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आल्यामुळे रात्री उशिरापर्यंत धनगर समाजबांधव आंदोलन करीत होते. मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन दरम्यान, रात्री उशिरा जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी धनगर समाज बांधवांच्या मोर्चाला भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मोबाईलवरून मोर्चेकऱ्यांशी संवाद साधून दिला. मुख्यमंत्र्यांनी आगामी एक वर्षाच्या कालावधीत धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिले.