शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कन्सेप्ट स्पष्ट असल्यास यश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:56 IST

लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व करिअर कॅम्पस प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग व स्टाफ सिलेक्शन परीक्षेच्या तयारीचे मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देसुशांत भगत : लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व करिअर कॅम्पस प्रशिक्षण संस्थेतर्फे कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकमत कॅम्पस क्लब, युवा नेक्स्ट व करिअर कॅम्पस प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बँकिंग व स्टाफ सिलेक्शन परीक्षेच्या तयारीचे मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. रामगोपाल माहेश्वरी भवन, झाशी राणी चौक येथे आयोजित कार्यशाळेत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.महाराष्टÑातील अनुभवी आणि प्रसिद्ध मार्गदर्शक सुशांत भगत यांनी बारावी उत्तीर्ण, पदवीधर तसेच अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रात नोकरी आणि करिअरबाबत माहिती दिली. बँकिंगच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती आणि नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. अशावेळी या क्षेत्रात संधी मिळविण्यासाठी बँकिंग आणि स्टाफ सिलेक्शन परीक्षांची तयारी महत्त्वाची आहे. कन्सेप्ट स्पष्ट असतील तर यश मिळविण्यास वेळ लागत नाही, असे मार्गदर्शन भगत यांनी केले. परीक्षेत येणारे प्रश्न कसे सोडवावेत आणि कमी वेळात अधिकाधिक तयारी कशी करावी, याबाबत त्यांनी इत्थंभूत माहिती दिली.‘आयबीपीएस पीओ’च्या नवीन पॅटर्नबाबत माहिती देत त्यांनी प्राथमिक परीक्षा व मुख्य परीक्षेची निर्धारित वेळ आणि गुण याबाबत माहिती दिली. बºयाच काळापासून तयारी करणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अशा विद्यार्थ्यांना आत्ममंथन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यश न मिळण्याचे नेमके कारण व कुठे चूक होत आहे, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, अशी सूचना त्यांनी दिली. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास अवघ्या पाच ते सहा महिन्याच्या तयारीत यशस्वी होता येते, असा विश्वास भगत यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी कार्यशाळेत करिअर कॅम्पस प्रशिक्षण संस्थेचे योगिता नवघरे व अमित तितरमारे उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी साधला संवादकार्यशाळेच्या अंतिम टप्प्यात विद्यार्थी व पालकांनी सुशांत भगत यांच्याशी संवाद साधला. स्पर्धा परीक्षा व त्याअंतर्गत तयारीबाबत अनेक शंका विद्यार्थी व पालकांनी मांडल्या. भगत यांनीही प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत विद्यार्थ्यांचे समाधान केले. कार्यशाळेदरम्यान करिअर कॅम्पसतर्फे बँकिंग परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक पुस्तकावर ५० टक्के सूट देण्यात आली.