शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान !

By admin | Updated: June 4, 2016 02:38 IST

काश्मीर मुद्दा हा भारत-पाकिस्तान मधील समस्येचे मूळ आहे. या मुद्यावर दोन्ही देशांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.

अब्दुल बासित : दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानची कडक भूमिकानागपूर : काश्मीर मुद्दा हा भारत-पाकिस्तान मधील समस्येचे मूळ आहे. या मुद्यावर दोन्ही देशांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे, अशी भूमिका पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी यावेळी मांडली. भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान शांती प्रस्थापित व्हावी हेच उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. जर दोन्ही देशांमधील कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान होईल. भारत-पाक संबंध तुटता तुटत नाहीत आणि दोन्ही देश सोबतही राहत नाहीत. दोन्ही देशांमधील दळणवळण सुविधा सुधारणे, पाकिस्तानचे चित्रपट तेथील मालिका भारतामध्ये दाखविल्या जाणे तसेच दोन्ही देशांमध्ये ‘व्हिसा’ची संख्या वाढविणे यासारख्या लहान लहान पुढाकारातून सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ शकते, असा विश्वास अब्दुल बासित यांनी व्यक्त केला. ‘इंडिया अ‍ॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’चे आयोजन’दहशतवाद पाकिस्तानच्या प्रगतीतील अडथळाभारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर काही वर्षांतच हे देश एकत्र येतील असे अनेकांना वाटायचे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये पाकिस्तानने फार वेगाने प्रगती केली. १९७० च्या दशकात तर पाकिस्तानचा विकास दर भारत आणि चीनपेक्षा जास्त होता. परंतु दहशतवादामुळे आमचे फार नुकसान झाले, असे अब्दुल बासित म्हणाले. पाकिस्तानमध्ये सोने, गॅस, दूध व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु जोपर्यंत देशात शांती प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हवी तशी प्रगती करता येणे शक्य नाही, असे ते म्हणाले. प्रत्येक वेळी भारतात कुठला हल्ला झाला की पाकिस्तानकडे बोट दाखविण्यात येते. परंतु आम्हीदेखील दहशतावादाच्या विरोधातच लढतो आहोत, हे लक्षात घ्यायला हवे, असे बासित यांनी प्रतिपादन केले.अफगाणिस्तान चिंतेचा विषय१९७९ मध्ये सोव्हियत युनियनने अफगाणिस्तानवर हल्ला केला व त्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवाद वाढीस लागला. अमेरिकेतील ९/११ नंतर तर स्थिती आणखी खराब झाली. अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सर्वात जास्त आम्हाला फटका बसला. सुमारे ३० लाख अफगाण शरणार्थी पाकिस्तानातील शरणार्थी शिबिरांमध्ये राहत आहेत. दहशतवादामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरदेखील परिणाम झाला. पाकिस्तान भारतासोबत संबंध सुधारावे यासाठी एकवेळ प्रतीक्षा करु शकतो परंतु अफगाणिस्तानमुळे निर्माण झालेली समस्या दूर करणे ही आमची प्राथमिकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.संबंध सुधारतीलदोन्ही देशांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. हा अविश्वास आजच्या परिस्थितीमुळे आहे की १९४७, १९६५ व १९७१ च्या युद्धांमुळे आहे याचा विचार करण्याची गरज आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु पठाणकोट हल्ल्यामुळे त्यात अडथळे आले. २६/११ प्रमाणे पठाणकोट हल्ल्यावरची प्रतिक्रिया तीव्र नव्हती असे म्हणताना हे संबंध परत सुधारतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.