शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

थंड डोक्याने कट रचला होता

By admin | Updated: May 6, 2016 02:55 IST

घटनाक्रम लक्षात घेता आरोपींनी युगचे अपहरण व हत्येचा अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता हे सिद्ध होते,

कट रचूनच युगची हत्यानागपूर : घटनाक्रम लक्षात घेता आरोपींनी युगचे अपहरण व हत्येचा अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता हे सिद्ध होते, असा निष्कर्ष न्यायालयाने नोंदविला आहे. शासनातर्फे उच्च न्यायालयातील मुख्य सरकारी वकील भारती डांगरे व जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड. ज्योती वजानी, युगचे वडील डॉ. मुकेश चांडक यांच्यातर्फे अ‍ॅड. राजेंद्र डागा तर, आरोपींतर्फे अ‍ॅड. मिर नगमान अली व अ‍ॅड. चेतन ठाकूर यांनी कामकाज पाहिले. (प्रतिनिधी)काय म्हणाले हायकोर्टहायकोर्टाने आरोपींना फाशीची शिक्षा देताना अत्यंत मार्मिक शब्दांत भावना व्यक्त केल्या. हायकोर्ट म्हणाले, एका निरागस मुलाचे जीवन उमलण्यापूर्वीच हिरावून घेणाऱ्या आरोपींबाबत दया दाखविण्याची अपेक्षा समाज आमच्याकडून करेल अशी ही घटना आहे काय? रात्रभरात श्रीमंत होण्याच्या हव्यासाने एका अल्पवयीन मुलाचा व त्याच्या संपूर्ण कुटुंबाचा छळ करणाऱ्या आरोपींना केवळ साधी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी अपेक्षा समाज आमच्याकडून करेल काय? ही घटना घडल्यानंतर संपूर्ण प्रदेशातील समाजमनाला जोरदार धक्का बसला हे सर्वांनाच माहीत आहे. या घटनेमुळे समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आई मुलांना शाळेत पाठविण्यास घाबरत होत्या. मुलाला शाळेत पाठविल्यानंतर तो घरी परत येईल की नाही अशी भीती त्यांना वाटत होती. या घटनेनंतर संपूर्ण समाजाने आंदोलने केली होती. कॅन्डल मार्च काढले होते. काय समाजाचा अंतरात्मा न्यायालयाने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे, अशी अपेक्षा करेल? आम्हाला असे वाटते की, अशा निर्घृण घटनेतील आरोपींना समाज कधीच क्षमा करणार नाही आणि त्यांना कठोरतेने हाताळले जावे अशीच एकूण समाजाची अपेक्षा आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचे समजून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी हीच याप्रकरणात समाजाची मागणी असल्याचे गृहित धरण्यात आम्हाला काहीच संकोच वाटत नाही.