शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

आयसीयूचे बांधकाम संथगतीने

By admin | Updated: November 2, 2016 02:30 IST

मेडिकलमध्ये २०११ मध्ये तीन कोटी रुपये खर्चून तीन विविध विभागाचे प्रत्येकी एक अतिदक्षता विभाग (आयसीयू) होणार होते.

मेडिकल : २५०८ चौरस मीटर जागेवर होत आहे बांधकामनागपूर : मेडिकलमध्ये २०११ मध्ये तीन कोटी रुपये खर्चून तीन विविध विभागाचे प्रत्येकी एक अतिदक्षता विभाग (आयसीयू) होणार होते. परंतु बांधकामाच्या जागेला घेऊन तत्काळ निर्णय होऊ न शकल्याने तब्बल तीन वर्षे बांधकाम रखडले. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे अधिष्ठातापदाची सूत्रे येताच त्यांनी या विभागाचे बांधकाम हाती घेतले. जागेचे क्षेत्रफळ वाढवून सुधारित १२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजनही झाले. परंतु पाच महिन्याचा कालावधी होत असताना बांधकामाला अद्यापही वेग आला नाही. मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) केवळ औषध वैद्यकशास्त्र विभागाचे आयसीयू आहे. मात्र, इतर विभागातील गंभीर रुग्णही येथेच ठेवले जात असल्याने हा विभाग नेहमीच फुल्ल असतो. अनेक वेळा बाहेरून येणाऱ्या गंभीर रुग्णांना खाटा नसल्याचे कारण सांगून खासगी रुग्णालयात पाठविण्याचे प्रकारही झाले. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने २०११ मध्ये पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत १५० कोटींच्या योजनेत ‘सर्जिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिट’, ‘मेडिसीन इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ आणि ‘नवजात शिशू इन्टेन्सिव्ह केअर युनिट’साठी ‘आयसीयू’च्या बांधकामाचा प्रस्ताव तयार केला. त्यावेळी हा प्रस्ताव १६९० चौरस मीटर जागेवर होणार होता. अपेक्षित खर्च ३ कोटी ४२ लाख २१ हजार रुपयांचा होता. विशेष म्हणजे, याला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. परंतु मेडिकलच्या २०० एकरच्या परिसरात या बांधकामासाठी जागा पाहायला तब्बल तीन वर्षे गेली. अखेर वॉर्ड क्र. ५ च्या मागील परिसरातील मोकळ्या जागेला बांधकाम विभागाने मंजुरी दिली. दरम्यान, डॉ. निसवाडे यांच्याकडे अधिष्ठातापदाची जबाबदारी येताच त्यांनी २५०८ चौरस मीटरपर्यंत बांधकामाचे क्षेत्र वाढविले. १२ कोटी ६ लाख ४३ हजार रुपयांचा हा सुधारित प्रस्ताव डीएमईआरकडे पाठविला. हिवाळी अधिवेशनातही या प्रस्तावावर चर्चा झाली. अखेर याला मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मे महिन्यात भूमिपूजन झाले. बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध असताना बांधकामाला अद्यापही गती आली नाही. यामुळे मुदतीत हे काम पूर्ण न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास गंभीर रुग्णांना आणखी काही काळ अद्ययावत उपचारापासून वंचित राहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)