शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

बर्फ खाताय की विष?

By admin | Updated: May 3, 2017 02:06 IST

कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे़

औद्योगिक वापराच्या बर्फाची खाण्यासाठी विक्री : अमोनिया वायू, दूषित पाणी जातेय पोटात सुमेध वाघमारे   नागपूर कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे़ आज आपण शहरभर जे आईस गोला, कोल्डड्रिंक, रसवंती व ज्यूस सेंटर बघत आहोत यात वापरला जाणारा बहुतांश बर्फ हा अखाद्य असून तो अमोनिया वायू, दूषित पाण्याद्वारे तयार करण्यात आलेला आहे़ शहरात बर्फ तयार करणाऱ्या सात कंपन्या आहेत. परंतु यातील केवळ दोनच कंपन्या खाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ बनवतात़ ज्याचा पुरवठा फक्त महागडे हॉटेल्स व बीअरबारमध्येच होतो. उर्वरित कंपन्यांचे खाण्यायोग्य नसलेला बर्फ ग्राहकांच्या माथी मारले जात आहे़ ‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी नागपुरात बर्फ तयार करणाऱ्या विविध कंपन्यांची पाहणी केली असता हा अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आला़ उपराजधानीच्या तापमानाचा पारा ४५ अंशापर्यंत गेला आहे. अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. कोल्डड्रिंक, रसवंती, लिंबू सरबत, आईस्क्र ीम व ज्यूस सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. एखादा बर्फाचा गोळेवाला अथवा सरबतवाला समोर आला तर त्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, रस किंवा अन्य पेयांत टाकण्यात येणारा बर्फाचा खडा कुठून येतो किंवा तो कसा तयार होतो, त्याठिकाणी आरोग्यदायी वातावरण आहे अथवा नाही याची कोणीच खातरजमा करीत नाही. शहरात बर्फ तयार करणाऱ्या कंपन्या ‘कुलिंग’साठीचाच अखाद्य बर्फ तयार करतात, तर इतर दोन कंपन्या ‘आईस क्यूब’ तयार करतात. हा महागडा बर्फ असल्याने याचा वापर मोठे हॉटेल्स, बीअरबार येथेच होतो. कुलिंगसाठी वापरण्यात येणारा बर्फच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. बर्फ बनविणाऱ्या कंपन्या आपला बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो फार काळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्यांच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते. हा बर्फ दूध, मासे आणि रासायनिक उत्पादनांना थंडावा (कुलिंग) देण्यासाठीच तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात, असे असतानाही प्रशासनाच्या नाकावर टिच्चून औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्य पदार्थ म्हणून सर्रास विक्री होत आहे. बर्फात मिसळतो ‘गंज’ बर्फाच्या लाद्या तयार करण्यासाठी जे साचे वापरले जातात, ते जस्ताचा थर दिलेले म्हणजेच ‘गॅल्व्हनाईज्ड ’ असणे आवश्यक आहे. यातही बर्फाची शुद्धता राखण्यासाठी जस्ताचे तीन थर दिलेल्या पत्र्याचे साचे वापरावेत, असा नियम आहे. परंतु, त्याची किंमत जास्त असल्यामुळे एक थर दिलेल्या पत्र्याचे साचे वापरले जातात. परिणामी, ते लवकर गंजतात आणि तो गंज बर्फाच्या पाण्यात मिसळू लागतो. त्यातून तो बर्फ वापरणे आरोग्यास हानीकारक ठरतो. विशेष म्हणजे गंजक्या टाक्या वापरू नये, असा नियम असतानाही तो पाळला जात नाही. फुटपाथवर विकला जातो बर्फ शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकातील फुटपाथवर सर्रास बर्फाची विक्री होते. बर्फ साठवण्याची ही जागा अत्यंत गलिच्छ असते. बर्फाला उन्ह लागू नये म्हणून तो ठेवण्याच्या जागेवर अंथरली जाणारी पोती तसेच बर्फाच्या लाद्यांना गुंडाळली जाणारी पोती अत्यंत घाणेरडी असतात. वितळणाऱ्या बर्फाचे पाणी पोत्याखाली साठून चिखल व नंतर डबके तयार होते. तरी बर्फ दिवसभर त्यातच असतो. हा सगळा प्रकार रोगराई पसरवणारा आहे. अस्वच्छ पाण्याचा बर्फ बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना नळाचे पाणी पुरत नाही म्हणून काही जण खासगी टॅँकरचे पाणी वापरतात. तर काही कारखाने विहीर किंवा बोअरवेलचे पाणी वापरतात. हे पाणी पिण्यास योग्य आहे की नाही, याची कोणतीही खातरजमा होत नाही. बर्फासाठी वापरण्यात येणारे पाणी निर्जंतुक आहे की नाही, याचीही तपासणी होत नाही. बहुसंख्य बर्फ हे अस्वच्छ पाण्यापासूनच तयार होतात. अन्न व औषध प्रशासन गप्प का? उन्हाळा लागताच अन्न व औषध प्रशासनाने बर्फ तयार करणाऱ्या कंपन्यांना भेटी देऊन या सगळ्या अनारोग्यदायक बाबींची पाहणी करून ती थांबवण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसून येत नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अखाद्य बर्फातील वायू घातकच बर्फबनविण्यापासून त्याच्यावर विविध प्रक्रि या केल्या जात असतात. बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो फार काळ टिकावा यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणावर अमोनिया वायूचा वापर केला जातो. त्याच्या जोडीला विविध वायूंचाही उपयोग होतो. हे सर्व वायू मानवी आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात.