शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

आयबीपीएसने निवडले, बँकेने नाकारले

By admin | Updated: August 9, 2014 02:33 IST

देशातील २० राष्ट्रीयकृत व शेड्युल बँकांत विविध पदांसाठी आयबीपीएसच्या (इन्स्टिट्यूट आॅफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाते.

नागपूर : देशातील २० राष्ट्रीयकृत व शेड्युल बँकांत विविध पदांसाठी आयबीपीएसच्या (इन्स्टिट्यूट आॅफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाते. आयबीपीएसने निवडलेल्या एका उमेदवारास पंजाब अँड सिंध बँकेने नियुक्त करण्यास चक्क नकार दिला आहे. कृषी अधिकारी (अ‍ॅग्रिकल्चर आॅफिसर) या पदासाठी सचिन शेषराव नारनवरे याने आयबीपीएसची परीक्षा दिली होती. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या वसुधाताई देशमुख कॉलेज आॅफ फूड टेक्नॉलॉजी येथून २०१० साली ‘बी.टेक’ची (फुड सायन्स) पदवी मिळविली. यानंतर आयबीपीएसची तयारी सुरू केली. दरम्यान २०१३ साली देशातील २० बँकात नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली. यात बँकेत अ‍ॅग्रिकल्चर आॅफिसर या पदासाठी देखील अर्ज मागविण्यात आले. होते. अर्ज भरल्यावर ८ फेब्रुवारीला लेखी परीक्षा झाली. यानंतर १८ मार्च रोजी सचिनची मुलाखत घेण्यात आली. १ एप्रिलला या दोन्ही परीक्षेचा निकाल जाहीर करून त्याला पंजाब अँड सिंध बँक येथे अ‍ॅग्रिकल्चर आॅफिसर म्हणून रुजू होण्यास सांगितले. मात्र बँकेत रुजू होण्यासाठी गेल्यावर सचिनला बँकेने तुम्ही जाहिरातीत दिलेल्या निकषात बसत नसल्याचे सांगून नियुक्ती करता येत नसल्याचे सांगितले. जाहिरातीत दिलेल्या पदव्यांच्या यादीत सचिनने धारण केलेल्या पदवीचा उल्लेख नसल्याचे बँकेने सांगितले आहे. याबाबत सचिनने आयबीपीएसच्या माध्यमातून निवड झालेले व समान पदवी धारण केलेले अनेक अधिकारी अन्य बँकांत नोकरी करीत असल्याचे सांगितले. याबाबत सचिनने आयबीपीएसशी पत्रव्यवहार केला. मात्र आयबीपीएस ही केवळ निवड करणारी संस्था असून नोकरी देण्याचे काम बँकेचे असल्याचे सांगून हात झटकले. यामुळे सचिन नारनवरे याने नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या पदभरतीवर उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. (प्रतिनिधी)