शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मी निवृत्त झालो नाही

By admin | Updated: October 28, 2016 02:46 IST

अनेकजण मला निवृत्त समजत असले तरी मी निवृत्त झालेलो नाही, असे भावनिक वक्तव्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे

अटलबहादूर सिंग : वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे सत्कारनागपूर : अनेकजण मला निवृत्त समजत असले तरी मी निवृत्त झालेलो नाही, असे भावनिक वक्तव्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (डब्ल्यूआयएफए) माजी उपाध्यक्ष आणि जिल्हा फुटबॉल संघटनेचे माजी अध्यक्ष सरदार अटलबहादूर सिंग यांनी केले. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनतर्फे गुरुवारी आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा, माजी खासदार दत्ता मेघे, माजी मंत्री नितीन राऊत, आमदार समीर मेघे, माजी महापौर कुंदाताई विजयकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अटलबहादूर यांना यावेळी शाल-श्रीफळ आणि आकर्षक सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. आपल्या छोटेखानी भाषणात गडकरी यांनी अटलबहादूर सिंग यांना चांगले आरोग्य लाभण्याची प्रार्थना करताना क्रीडा क्षेत्रात विशेषत: फुटबॉलमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची प्रशंसा केली. नागपूरचे दोनदा महापौरपद भूषविणारे आणि प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्काराचे (२०१४) मानकरी सरदार अटलबहादूर सिंग यांनी सत्कार करण्यात आल्यानंतर डब्ल्यूआयएफ व जिल्हा फुटबॉल संघटनेच्या सर्व सदस्यांनी आभार व्यक्त केले. अटलबहादूर मंदस्मित करीत म्हणाले,‘लोक मला निवृत्त समजत असले तरी मी निवृत्त झालेलो नाही. मी नेहमी मित्र जोडण्यावर भर दिला. कदाचित मला कुणी शत्रूच नाही.’ सत्काराबाबत बोलताना ते म्हणाले,‘मी ज्याप्रकारे क्रीडाप्रेमी व खेळाडूंचा सत्कार केला तशाच प्रकारे माझाही कुणी सत्कार करेल, याचा मी कधी विचारही केला नाही.’ कार्यक्रमाला डब्ल्यूआयएफएचे सचिव साउटर वाज, हेन्री मेनेजेस, जिल्हा फुटबॉल संघटनचे अध्यक्ष हरेश व्होरा, सचिव युजिन नॉर्बट आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)