शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खिडकीवर चावी विसरली, ११ लाखाचे दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST

नागपूर : मुख्य दाराच्या कुलपाची चावी खिडकीत ठेवून बाहेर गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरातून ११ लाखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी उडविले. ...

नागपूर : मुख्य दाराच्या कुलपाची चावी खिडकीत ठेवून बाहेर गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या घरातून ११ लाखाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी उडविले. ही घटना हुडकेश्वर ठाण्याच्या महालक्ष्मीनगरात घडली.

महालक्ष्मीनगर येथील रहिवासी ज्ञानेश्वर पराते (५८) ३१ जानेवारीला डाक विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांची पत्नी पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी आहे. परिवारात एक मुलगा असून मुलीचे लग्न झाले आहे. मुलगा रविवारी फिरायला गेला आहे. मंगळवारी दुपारी १ वाजता पराते महालच्या डाकघरात कामासाठी गेले होते. त्यांनी मुख्य दाराला कुलूप लावून त्याची चावी खिडकीजवळ ठेवली. ते चावी सोबत नेण्याचे विसरले. ते जाताच चोरट्यांनी खिडकीवर ठेवलेल्या चावीने कुलूप उघडून आत प्रवेश केला. बेडरूमच्या आलमारीतून चोरट्यांनी २५ तोळे सोन्याचे दागिने व १० हजार रुपये रोख चोरी केले. चोरी केल्यानंतर आरोपींनी मुख्य दार आतून बंद केले व पूजा घरातून फरार झाले. दुपारी ३.३० वाजता पराते घरी पोहोचले. त्यांना चावी दिसली नाही. मुख्य दारही आतून बंद होते. पराते यांनी घराची पाहणी केली असता पूजाघराचा दरवाजा उघडा दिसला. तेथून आत गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याबाबत सूचना मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळावरून फिंगर प्रिंट आणि इतर पुरावे गोळा केले. पराते यांच्या घरासमोर मैदान आणि मंदिर आहे. काही दूर अंतरावर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु आरोपी कॅमेऱ्यात कैद झाले नाहीत. चावी हातात लागल्यामुळे आरोपींना चोरी करणे सहज शक्य झाले. आरोपी परिसरातीलच असावेत, असा पोलिसांचा अंदाज आहे. चावी खिडकीवर का ठेवली, अशी विचारणा केली असता पराते यांनी चुकीने राहिल्याचे सांगितले. पोलिसांनी याबाबत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

...........

भाडेकरूने चोरी केले २.५० लाख

जरीपटक्यात एक महिलेच्या घरातून जुन्या भाडेकरूने २.५० लाख रुपये चोरी केले आहेत. रिपब्लिकननगर येथील रहिवासी पूजा सुधीर कुर्वे यांच्या घरी भरत वासवानी राहत होता. आता तो दुसरीकडे राहतो. ८ फेब्रुवारीला सायंकाळी पूजा घरी भांडी घासत होती. तिला भरत वासवानी घरातून पळून जाताना दिसला. पूजाला आलमारी उघडी दिसली. त्यातील २.५० लाख रुपये चोरी झाले होते. जरीपटका पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

..............