शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

विदेशी गुंतवणूक, प्लास्टिक बंदी या गोष्टींचे मी समर्थन करत नाही! नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 21:16 IST

देशात विदेशी गुंतवणूक व्हावी, या गोष्टींचे समर्थन करत नाही. मात्र, विरोध करण्याला काही कारणही नाही. देशातला पैसा देशातच गुंतवावा, उद्योग वाढावा, मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे, देशाची गरज भागून उरलेले उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावे आणि त्यायोगे रोजगारात वाढ व्हावी. ही स्थिती लघू-सुक्ष्म-मध्यम उद्योगांमुळेच शक्य आहे आणि त्याअनुषंगाने लघु उद्योग भारतीने पुढाकार घ्यावा, त्यासाठी सरकार तत्पर असल्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देएमएसएमईसाठी लवकरच वेबपोर्टल, पेमेंट ४५ दिवसाच्या आत मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात विदेशी गुंतवणूक व्हावी, या गोष्टींचे समर्थन करत नाही. मात्र, विरोध करण्याला काही कारणही नाही. देशातला पैसा देशातच गुंतवावा, उद्योग वाढावा, मोठ्या प्रमाणात उत्पादन व्हावे, देशाची गरज भागून उरलेले उत्पादन मोठ्या प्रमाणात निर्यात व्हावे आणि त्यायोगे रोजगारात वाढ व्हावी. ही स्थिती लघू-सुक्ष्म-मध्यम उद्योगांमुळेच शक्य आहे आणि त्याअनुषंगाने लघु उद्योग भारतीने पुढाकार घ्यावा, त्यासाठी सरकार तत्पर असल्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले.रेशिमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात लघु भारतीचे रौप्य महोत्सव वर्ष अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी ‘सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग : समग्र निती’ या विषयावरील चर्चासत्रात गडकरी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल, लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष जितेंद्र गुप्त, महामंत्री गोविंद लेले, ओमप्रकाश मित्तल, सुधिर दाते उपस्थित होते.अलिबाबा, अ‍ॅमेझॉनसारख्या व्यावसायिक वेबपोर्टलमधून लघु उद्योगांमधील उत्पादनांना प्रचंड मागणी वाढत आहे. हिमालयात तयार झालेले मध तब्बल ७० हजार रुपये किलो दराने विकले जात आहे. मात्र, आपल्या रानावनात तयार झालेल्या चविष्ट आणि पौष्टिक मधाला शंभर रुपयेही मिळत नाही. हा मार्केटिंगचा दोष असून, हा दोष दूर करण्यासाठी भारत क्राफ्ट आणि जेमच्या सहयोगाने लवकरच एमएसएमई साठी वेबपोर्टल सादर होणार असून, या पोर्टलचे वार्षित उत्पन्न दहा लाख कोटी पर्यंत नेण्याचा माझे उद्दीष्ट असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले. देशात अनेक गोष्टींच्या समस्या आहेत. मात्र, त्यावर बंदी हा उपाय नसून, पर्याय उपलब्ध करणे हा उपाय असतो. प्लास्टिकचा उपयोग मोठा आहे. मात्र, पर्यावरणामुळे प्लास्टिक बंदी कशासाठी? त्यापेक्षा पर्याय आणणे गरजेचे. म्हणून ब्राझिलवरून पर्यावरण उपयुक्त तंत्रज्ञान आणून नव्या तऱ्हेचे प्लास्टिक तयार केले जात आहे. त्यासाठी एमएसएमईने पुढाकार घ्यावा. त्याअनुषंगाने विविध लघु उद्योगांसाठी सरकारी अडथळे दूर करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या क्षेत्रातील उद्योगांचे पेमेंट ४५ दिवसाच्या आत मिळावे, हा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असे आश्वासन नितीन गडकरी यांनी यावेळी दिले.सुदर्शनजींवर लोक हसायचे!माजी सरसंघचालक सुदर्शन यांनी देशातल्या तेलबियांतून इंधन तयार होऊ शकते, असा विश्वास दिला. मात्र, त्यांच्यावर लोक हसायचे. असे शक्यच नाही, असे म्हणायचे. मात्र, मी त्यांच्याशी जुळलो आणि त्यांचे भाकित सत्यात उतरवले. लाखो लोकांना त्यापासून रोजगार मिळू शकतो, हे मी प्रात्याक्षिकातून सांगू शकतो. लघू उद्योगांनी विश्वास ठेवणे गरजेचे आहे आणि आधुनिकतेशी सांगड घालणे गरजेचे आहे. पाच कोटी लोकांना नवे रोजगार यातून निर्माण होतील, असेही गडकरी यावेळी म्हणाले.१६५ कोटी लोकांची गरज भागेल, एवढे उत्पादन करा - कृष्णगोपालदेशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. असे असतानाही आपल्या देशात आयात मोठ्या प्रमाणात होते. लघु-सुक्ष्म-मध्यम उद्योगांतून ही तुट भरून काढायची आहे. त्यासाठी सरकारने निती धोरण योग्यतऱ्हेने अंमलात आणावे आणि या उद्योग क्षेत्रातून १६५ कोटी लोकांची गरज पूर्ण होईल, एवढे उत्पादन करण्यावर भर द्यावे. जेणेकरून भारतीयांची गरज पूर्ण होऊन निर्यातीला वाव मिळेल, असे आवाहन सहसरकार्यवाह डॉ. कृष्णगोपाल यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSmall Businessesलघु उद्योग