शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

हायप्रोफाईल सेक्सवर्कर गजाआड

By admin | Updated: August 5, 2014 01:01 IST

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आज सीताबर्डीतील एका लॉजवर धाड घालून लुधियाना(पंजाब)मधील एका हायप्रोफाईल सेक्सवर्करसह चार तरुणी आणि तीन दलालांना जेरबंद केले.

पंजाब, दिल्ली, मुंबईशी कनेक्शन : दोन दलालांसह तिघे अटकेतनागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने आज सीताबर्डीतील एका लॉजवर धाड घालून लुधियाना(पंजाब)मधील एका हायप्रोफाईल सेक्सवर्करसह चार तरुणी आणि तीन दलालांना जेरबंद केले. ही सेक्सवर्कर वर्धा मार्गावरील एका महागड्या हॉटेलमध्ये दोन दिवसांपासून मुक्कामी आहे.सीताबर्डीतील शुक्ला लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला कळली. त्यावरून डीसीपी सुनील कोल्हे, एसीपी नीलेश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचला. दुपारी २.१५ ला पोलिसांचे पंटर कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेशी भेटले. तिने प्रत्येकी एक हजार रुपये घेऊन शुक्ला लॉजमध्ये बोलविले. तेथे तीन तरुणी उपलब्ध करून दिल्या. दरम्यान, पोलीस निरीक्षक बी. एम. पोवार, सहायक निरीक्षक अमिता जयपूरकर, पीएसआय मदने, हवालदार घनश्याम, एस.एम. गोराडे, हवालदार पांडुरंग, अजय घाटोळ, संजय पांडे, गोपाल वैद्य,अस्मिता मेश्राम, अनिता धुर्वे आणि नीता डाखोळे लॉजच्या बाहेर दबा धरून बसले होते. सेक्स रॅकेट चालविणारा मुख्य आरोपी सय्यद अमजद अली अहमद अली (वय ३५, रा. छोटा लोहारपुरा, गांधीबाग) हा होंडा सिटीने तरुणींना घेऊन लॉजमध्ये पोहोचला. तीन तरुणी आतमध्ये गेल्या. एक मात्र त्याच्यासोबत कारमध्येच बसून होती. तोच मुख्य दलाल असल्याचे लक्षात आल्यामुळे पोवार आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्याच्याकडे धाव घेतली. पोलिसांना पाहून अमजदने आपली कार वेगाने मॉरिस टी पॉर्इंटकडे दौडवली. तेथून तो उड्डाणपुलावर चढला आणि सुसाट वेगाने पळून जाऊ लागला. पोलिसांनीही त्याचा सिनेस्टाईल पाठलाग केला आणि रहाटे चौकातील सिग्नलच्या पुढे त्याच्या कारसमोर वाहन घालून त्याला रोखले. त्याला आणि कारमध्ये बसलेल्या तरुणीला पोलिसांनी जेरबंद करून लॉजमध्ये आणले. तोपर्यंत इकडच्या पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन तरुणी, मोहम्मद राजा अब्दुल अजीज (वय २६, रा़ इतवारी, शहीद चौक, नागपूर) आणि लॉजमालक मनोज शुक्ला याला ताब्यात घेतले होते. या सर्वांना सायंकाळी ५ वाजता गुन्हे शाखेत आणून तेथे कारवाई करण्यात आली.सीताबर्डी पोलिसांचे पाप उघडसीताबर्डीतील काही लॉजमध्ये सर्रास वेश्याव्यवसाय चालविला जातो. सीताबर्डी पोलिसांनाही या गोरखधंद्याची माहिती आहे. मात्र, सीताबर्डी ठाण्यातील काही जण ही पापाची कमाई खात असल्यामुळे या धंद्याकडे ते दुर्लक्ष करतात. आजच्या कारवाईमुळे सीताबर्डी पोलिसांचे पाप उघड झाले आहे. पोलीस चक्रावलेआरोपीच्या कारची झडती घेतली असता पोलीस चक्रावले. आरोपी अमजद आणि राजाकडे देहविक्रयाच्या धंद्यात गुंतलेल्या दोन-तीनशे महिला, तरुणींचे मोबाईल क्रमांक तसेच शहरातील काही व्यापारी, उद्योजकांसह अनेक लब्धप्रतिष्ठितांचेही संपर्क क्रमांक आढळले. अमजद गेल्या अनेक वर्षांपासून वेश्या पुरविण्याचे काम करतो. (प्रतिनिधी)