शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श..झाली एकदाची परीक्षा

By admin | Updated: May 9, 2014 02:33 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली 'एमएच-सीईटी' ही प्रवेशपरीक्षा गुरुवारी सुरळीतपणे पार पडली.

नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी अनिवार्य असलेली 'एमएच-सीईटी' ही प्रवेशपरीक्षा गुरुवारी सुरळीतपणे पार पडली. 'डीएमईआर'तर्फे (डायरेक्टोरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च) घेण्यात आलेल्या या परीक्षेत नागपूर विभागातील १४ हजार ८१ विद्यार्थी उपस्थित होते. नागपूर जिल्ह्यातील ६ हजार ३६0 विद्यार्थ्यांनी उपराजधानीतील परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. गुरुवारी सकाळी १0 वाजता परीक्षा सुरू झाली. परंतु 'डीएमईआर'ने दिलेल्या निर्देशांनुसार सर्व परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ वाजल्यापासून विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. अर्धा तास अगोदर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या आत प्रवेश देण्यात आला. ठीक १0 वाजता परीक्षेला आरंभ झाला. शहरातील सर्वच केंद्रांवर अगदी निर्विघ्नपणे परीक्षा पार पडली. कुठल्याही केंद्रावरून अनुचित प्रकार घडल्याची माहिती समोर आली नाही. नागपूर जिल्ह्यातील एकूण ६ हजार ५६३ विद्यार्थ्यांपैकी २0३ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर विभागात १४,४६१ पैकी ३८0 विद्यार्थी अनुपस्थित होते.थोडा उत्साह, थोडी भीतीपहिल्यांदाच ही परीक्षा होत असल्यामुळे विद्यार्थांमध्ये थोडा उत्साह अन् थोडी भीती असे वातावरण होते. परंतु १ वाजता बाहेर पडताना अनेक विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर मोठे दडपण दूर झाल्याचे भाव होते. 'एआयपीएमटी'च्या तुलनेत 'एमएच-सीईटी'चा पेपर सोपा असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. विशेषत: रसायनशास्त्र व जीवशास्त्राचा पेपर चांगला केला. केवळ भौतिकशास्त्राचा पेपर थोडा कठीण वाटला, असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले.पालकांचीदेखील परीक्षाही परीक्षा द्यायला नागपूर जिल्ह्यातील निरनिराळ्या ठिकाणांहून विद्यार्थी आले होते. शहरात आभाळ असल्याने ऊन जरी फारसे तापले नसले तरी उकाडा मात्र कायम होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना सोडायला आलेल्या पालकांची परीक्षा केंद्रांच्या बाहेर परीक्षाच झाली. अनेकांनी तर तीन तास जवळील झाडाखाली बसूनच घालवला. (प्रतिनिधी) जिल्हा उपस्थित अनुपस्थितनागपूर ६,३६0 २0३चंद्रपूर २,१0२ ४७वर्धा १,५१२ ३१भंडारा १,७६८ ४२गोंदिया १,६७४ ३६गडचिरोली ६६५ २१एकूण १४,0८१ ३८0