शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, अपत्यांचे पालनपोषण हे पुरुषाचे दायित्व; उच्च न्यायालयाचा निकाल

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: January 25, 2023 08:31 IST

पत्नी व अपत्यांचे पालनपोषण करणे पुरुषाचे नैतिक, सामाजिक व कायदेशीर दायित्व आहे.

नागपूर :

पत्नी व अपत्यांचे पालनपोषण करणे पुरुषाचे नैतिक, सामाजिक व कायदेशीर दायित्व आहे. पुरुष या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदविले.

न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी हा निर्णय दिला. पत्नी व दोन वर्षांच्या मुलाला कुटुंब न्यायालयामध्ये मंजूर झालेल्या खावटीविरुद्ध गोंदिया जिल्ह्यातील पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने पतीला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देत ती याचिका फेटाळली व खावटीचा आदेश कायम ठेवला. 

कुटुंब न्यायालयाने पत्नीला पाच हजार व मुलाला दोन हजार रुपये खावटी मंजूर केली आहे. पतीच्या उत्पन्नाचे पुरावे लक्षात घेता, ही खावटी जास्त नाही. या रकमेतून केवळ अन्न, वस्त्र व निवाऱ्याची व्यवस्था होऊ शकते. प्रकरणातील दाम्पत्य उच्चशिक्षित आहे. कायद्यानुसार पत्नीला पतीच्या दर्जाचे जीवन जगण्याचा अधिकार आहे, असेही उच्च न्यायालय म्हणाले. पत्नी यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी आहे.

खावटीसाठी हिंदू महिलांना चार कायद्यांचा आधारपात्र हिंदू महिलांना (मुस्लीम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू व अपवाद वगळता इतर सर्व) हिंदू विवाह कायदा-१९५५ (कलम २४ व २५), हिंदू दत्तक व निर्वाह कायदा-१९५६ (कलम १८ व १९), कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा-२००५ (कलम २०) व फाैजदारी प्रक्रिया संहिता (कलम १२५) या चार कायद्यांतर्गत खावटीची मागणी करता येते. हिंदू महिलांमध्ये बौद्ध, जैन व शीख महिलांचा समावेश होतो.     - ॲड. शशिभूषण वहाणे, हायकोर्ट

दोन वर्षांतच वाद विकोपाला- या दाम्पत्यामधील वाद लग्नानंतर दोन वर्षांतच विकोपाला गेला. - त्यांचे ९ मे, २०१७ रोजी लग्न झाले. पती हा पत्नीला चांगली वागणूक देत नव्हता. - तिचा सतत छळ करीत होता. त्यामुळे ती ६ सप्टेंबर, २०१९ रोजी पतीपासून विभक्त होऊन माहेरी राहायला गेली.