शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या छळात पतीला कारावास

By admin | Updated: December 11, 2015 03:52 IST

एका विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक ...

न्यायालय : हुंडाबळी, खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तनागपूर : एका विवाहितेच्या मृत्यू प्रकरणात शारीरिक व मानसिक छळाचा गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहम्मद सादिक यांच्या न्यायालयाने आरोपी पतीला तीन वर्षे सश्रम कारावास आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाने भादंविच्या कलम ३०४ -ब (हुंडाबळी), ३०२ (खून) आणि ३०६ (आत्महत्येस प्रवृत्त) या आरोपातून आरोपीची निर्दोष सुटका केली. परेश शालिकराम जिचकार (३४), असे आरोपी पतीचे नाव असून तो काटोल तालुक्यातील अंजनगाव येथील मूळ रहिवासी आहे. दुर्गा परेश जिचकार, असे मृत विवाहितेचे नाव होते. काटोल तालुक्यातील कुकडी पांजरा येथील रहिवासी शंकर नारायण गेडाम यांची मुलगी दुर्गा हिचा विवाह परेशसोबत ११ फेब्रुवारी २००७ रोजी झाला होता. आपण सिव्हिल लाईन्स नागपूर येथील आयसीआयसीआय बँकेत नोकरी करीत असल्याचे परेशने लग्नापूर्वी सांगितले होते. प्रत्यक्षात तो बँकेत कामावर जात नव्हता. प्रारंभी पती-पत्नी मानेवाडा रोड येथील जवाहरनगर येथे भाड्याने राहत होते. त्यानंतर ते विश्वकर्मानगर येथील संजय बंडे यांच्या घरी भाड्याने राहण्यास आले होते. सासऱ्याने शेत विकल्याचे समजताच परेशने दुर्गाला माहेरहून दोन लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता. पैशासाठी तो तिचा मानसिक व शारीरिक छळ करायचा. मुलीचा छळ थांबावा म्हणून शंकर गेडाम यांनी आपले मोठे जावई बाळनाथ मानकर यांच्या हाताने परेशला देण्यासाठी १ लाखाचा चेक पाठविला होता. तरीही त्याने दुर्गाचा छळ करणे थांबवले नव्हते. पुन्हा त्याने २० हजाराची मागणी केल्याने गेडाम यांनी दीड तोळ्याचा सोन्याचा गोफ त्याला गहाण ठेवण्यास दिला होता. आरोपीची पैशाची मागणी वाढत होती. त्याने छळ थांबवला नव्हता. अखेर पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून दुर्गाने विष प्राशन केले होते. भांडे प्लॉट येथील नेरकर इस्पितळात तिचा मृत्यू झाला होता. अजनी पोलिसांनी शंकर गेडाम यांच्या तक्रारीवरून हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला होता. भादंवि ३०२, ३०६ अन्वये पर्यायी कलमान्वये आरोप निश्चित करण्यात आले होते. न्यायालयात सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील रवींद्र भोयर आणि आरोपीच्या वतीने अ‍ॅड. ए. आर. इटनकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)