शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
3
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
4
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
5
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
6
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
7
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
8
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
9
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
10
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
11
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
12
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
13
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
14
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
15
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
16
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
17
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
18
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
19
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
20
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला

पत्नीच्या वर्तनाला कंटाळून पतीची आत्महत्या

By admin | Updated: September 19, 2016 02:37 IST

पत्नीच्या वर्तनाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. अभिषेक हिरालाल देशमुख (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.

हुडकेश्वरमधील घटना : पोलिसांनी केला गुन्हा दाखल नागपूर : पत्नीच्या वर्तनाला कंटाळून पतीने गळफास लावून आत्महत्या केली. अभिषेक हिरालाल देशमुख (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो चंदनशेषनगर हुडकेश्वरमधील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहत होता. हारफुलांचा व्यवसाय करणाऱ्या अभिषेकचे वर्षभरापूर्वी नागपुरातीलच सोनू ऊर्फ ऐश्वर्यासोबत लग्न झाले होते. काही दिवस ठीक गेल्यानंतर सोनू आणि अभिषेकमध्ये भांडणे व्हायला लागली. अभिषेकचा भाऊ योगेश याच्या तक्रारीनुसार, सोनू तिची मावस बहीण कोमल ढोंगे हिच्यासोबत उठसूठ बाहेर फिरायला जात होती. बाहेर जाण्याचे कारणही सांगत नव्हती. प्रत्येकवेळी ती बाहेर निघून जात असल्याने अभिषेक तिला विचारणा करायचा. मात्र, ती त्याला दाद देत नव्हती. बाहेर फिरायला जाण्यास मनाई केली तर सोनू अभिषेकसोबत भांडण करायची. तिच्या या वर्तनाने सोनू त्रस्त झाला होता. बाहेर बदनामी होत असल्यामुळे त्याच्या मनावर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे त्याने गुरुवारी १५ सप्टेंबरला दुपारी घरी कुणी नसल्याचे पाहून गळफास लावून घेतला. सायंकाळी ५.३० वाजता ही घटना उघडकीस आली. अभिषेकने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली. आत्महत्येला पत्नी सोनू हिचे वर्तनच कारणीभूत असल्याचे त्याने चिठ्ठीत नमूद केले. या घटनेमुळे देशमुख कुटुंबीयात तीव्र रोष निर्माण झाला. योगेश हिरालाल देशमुख (वय २४, रा. शिवनगाव) यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वरच्या महिला पोलीस उपनिरीक्षक भोयर यांनी आरोपी पत्नीविरुद्ध कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेमुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.(प्रतिनिधी)पत्नीच्या रागावर आत्महत्येचा प्रयत्न पत्नी भांडण करून माहेरी निघून गेल्याने निराश झालेल्या रोशन दत्तूजी मांडळकर (वय ३३) नामक तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. मांडळकर गंगाजमुना जवळच्या मासुरकर चौकानजीक राहतो. तो पेंटर आहे. दारूच्या नशेत पत्नीसोबत त्याचा वाद झाल्याने रागाच्या भरात पत्नी तिच्या माहेरी निघून गेली. त्यामुळे रोशनने रविवारी सकाळी स्वत:च्या घराजवळ आपल्या हाताची नस ब्लेडने कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत त्याला शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी लकडगंज पोलिसांना कळविले. उपचारानंतर लकडगंज पोलिसांनी आरोपी मांढळकरविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला.