शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पतीने केली पत्नीची हत्या

By admin | Updated: October 24, 2015 03:17 IST

संशयाने पछाडलेल्या कंत्राटदाराने आपल्या पत्नीची अमानुष हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद अर्पणनगरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही थरारक घटना घडली.

नागपूर : संशयाने पछाडलेल्या कंत्राटदाराने आपल्या पत्नीची अमानुष हत्या केली. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंद अर्पणनगरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही थरारक घटना घडली. दीपक हेमाजी चंद्रिकापुरे (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. दीपक बांधकाम कंत्राटदार असून, त्याला एक मुलगा तसेच एक मुलगी आहे. या दोघांचेही लग्न झाले. दीपकच्या लग्नाला २५ वर्षे झाली. मात्र त्याच्या संशयीवृत्तीत फरक पडला नाही. घरात पत्नी निलू (वय ४२), विवाहित मुलगा, सून आणि नातू असूनही तो पत्नीवर संशय घेत होता. ४ दिवसांपूर्वी रात्री जेवण झाल्यानंतर त्याने पत्नीला गरबा बघून येऊ, असे म्हटले. पत्नीने नकार दिला. त्यामुळे तो नातवाला घेऊन गरबा बघायला गेला. मध्यरात्री परत आल्यानंतर त्याने दार ठोठावले. पत्नीने दार उघडण्यास विलंब केला. त्यामुळे त्याच्या डोक्यातील संशयाचा किडा वळवळू लागला. पत्नी निलूवर चारित्र्याचा संशय घेऊन त्याने भांडण उकरून काढले. चार दिवसांपासून त्यांच्यात भांडण सुरू होते. गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र आनंदोत्सव सुरू असताना दीपक भलत्याच विचाराने पेटला होता. त्याने पुन्हा भांडण सुरू केले. मध्यरात्रीपर्यंत ते सुरूच होते. मुलगा, सून यांनी त्याची समजूत काढली मात्र तो मानायला तयार नव्हता. रागारागात पत्नी निलू आपल्या समोरच्या हॉलमध्येच झोपल्या तर, आरोपी दीपक पहिल्या माळ्यावरील शयनकक्षात झोपायला गेला. मध्यरात्री १ च्या दरम्यान, सर्व झोपी गेल्याचे पाहून तो खाली उतरला. त्याने पत्नी निलूला जागे केले आणि काही कळायच्या आतच पोटावर, छातीवर गुप्तीचे सपासप घाव घालून ठार मारले. निलू यांच्या किंकाळ्यांनी बाजूच्याच शयनकक्षात झोपलेला मुलगा, सून धावत हॉलमध्ये आले. निलू रक्ताच्या थारोळ्यात वेदनांनी विव्हळत होत्या. आरोपी दीपक मात्र पळून गेला. संदीपने आपल्या आईला डॉक्टरकडे नेले. मात्र डॉक्टरांनी निलू यांना मृत घोषित केले. (प्रतिनिधी) चांगला संसार विस्कटलासंशयाचे भूत डोक्यावर बसले की कसा चांगला संसार विस्कटतो, त्याची प्रचिती या घटनेतून आली आहे. मुलगी सासरी नांदते आहे. मुलगा संदीप मोबाईलचे दुकान चालवतो. घरात सून, गोंडस नातू आणि सारखे भांडणं करूनही २५ वर्षांपासून संसाराचा गाडा रेटणारी पत्नी, असा चांगला परिवार होता. मात्र, दीपकच्या डोक्यावर बसून नाचणाऱ्या संशयाच्या भूताने अखेर त्याच्या हातून पत्नीची हत्या घडविली. या घटनेमुळे त्याच्या सुखी संसाराची घडी विस्कटली. संदीपच्या तक्रारीवरून सोनेगावचे ठाणेदार अरुण जगताप यांनी लगेच शोधाशोध करून आरोपी दीपकच्या मुसक्या बांधल्या. सहायक निरीक्षक येळे यांनी आरोपीला कोर्टात हजर करून त्याची २९ आॅक्टोबरपर्यंत कोठडी मिळवली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.