शहरं
Join us  
Trending Stories
1
"३१ हजार कोटींच्या पॅकेजचे समर्थन करायला तयार, पण माझी एक अट", उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मोठी मागणी
2
राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना
3
"बोलायचं स्वदेशीचं आणि घडी वापरायची विदेशी"; CM योगी आदित्यनाथांनी खासदार रवि किशन यांना भरसभेत सुनावले
4
Shubman Gill Record : टीम इंडियातील 'प्रिन्स'ची कमाल; क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'चा महारेकॉर्ड मोडला
5
"लोकसभा निवडणुकीत भुमरेंनी माझ्या विरोधात १२० कोटी वाटले, शेतकऱ्यांना दारू पाजून...!" खैरेंचा गंभीर आरोप
6
जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली
7
सचिन तेंडुलकरची साद, माणिकराव कोकाटेंचा तत्काळ प्रतिसाद; खेळाडूंसाठी घेतला मोठा निर्णय
8
E20 पेट्रोलबाबतचा संभ्रम संपला! बाजारात कोणत्या पेट्रोलमध्ये इथेनॉल आहे आणि कोणत्या नाही...
9
झाड नाही, 'काळजाचा तुकडा' तोडला! २० वर्षे जपलेल्या वृक्षासाठी आजींचा आक्रोश; व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल
10
राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...
11
“हंबरडा मोर्चापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकदा आरशात पाहावे”; CM देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका
12
अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक; बनावट बँक हमी प्रकरणात ED ची मोठी कारवाई
13
ग्रामीण भारताचा विकास करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथि; त्यांच्या कार्याचा आढावा!
14
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांची प्रकृती स्थिर, पण दुसऱ्यांची किडनी घेण्यासाठी नकार; कारण... 
15
मित्रासोबत बाहेर फिरायला मेडिकलची विद्यार्थीनी गेली, लैंगिक अत्याचाराचा आरोप; रुग्णालयात उपचार सुरू
16
तिसऱ्या भिडूमुळे आघाडीत धुसफुस? काँग्रेसचा ‘त्या’ मतांवर डोळा, तर उद्धवसेनेची मोठी पंचाईत!
17
तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकीच्या पत्रकार परिषदेत महिला पत्रकारांना No Entry; विरोधक आक्रमक, प्रियांका गांधींचा PM मोदींवर निशाणा
18
मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
19
नोबेल पुरस्कार हुकला, ट्रम्प यांनी चीनवर राग काढला? चिनी वस्तूंवर १०० टक्के अतिरिक्त टॅरिफ
20
"एअर इंडियाच्या बोइंग 787 विमानांची उड्डाणं रोखावीत"; भारतीय पायलट संघाचं सरकारला पत्र; केल्या तीन मागण्या

नातेवाईकांसह नवऱ्यालाही गंडविले

By admin | Updated: February 8, 2016 03:20 IST

पुणे-मुंबईतील अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या पुण्यातील एका महिलेने नातेवाईकांसह चक्क स्वत:च्या पतीलाही गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

८७ लाखांचा गंडा : पुण्यातील महिलेचा प्रतापनागपूर : पुणे-मुंबईतील अनेकांना कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या पुण्यातील एका महिलेने नातेवाईकांसह चक्क स्वत:च्या पतीलाही गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. अनघा कार्तिक बोरीकर (वय २९) असे या महिलेचे नाव असून, अंबाझरी पोलिसांनी तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रीनलँड कौंटी, नवले कॉम्प्लेक्सजवळ, नरेगाव (पुणे) येथे राहणारी अनघा नागपुरातील व्यावसायिक कार्तिक रमेश बोरीकर (वय ३३) यांची पत्नी होय. ते अंबाझरी लेआऊट, नागपूर येथे राहतात. अनघाने २७ जानेवारी २०१६ पूर्वी बनावट दस्तऐवज तयार केले. त्यावर कार्तिक यांची बनावट स्वाक्षरी करून पतीच्या नातवाईकांच्या मोबाईल व्हॉट्स अ‍ॅपवर हे बनावट दस्तऐवज पाठविले. त्याआधारे नऊ जणांना स्वस्तात कार मिळवून देण्याची आणि कार न दिल्यास घेतलेली रक्कम व्याजासह परत करण्याची तयारी दाखवून ८६ लाख ८४ हजार ६०९ रुपयांचा गंडा घातला. कुण्या कारणाने कार मिळाली नाही तर आपली रक्कम व्याजासह परत मिळणार आणि त्याची हमी कार्तिक बोरीकर हे घेत असल्याचा गैरसमज झाल्यामुळे नऊ जणांनी अनघाला रक्कम दिली. ती रक्कम हडपल्यानंतर अनघा टाळाटाळ करीत असल्याचे पाहून नातेवाईकांनी कार्तिक बोरीकर यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर तिची बनवाबनवी उघड झाली. पत्नीकडून फसवणुकीसोबतच आपली प्रतिमाही खराब केली जात असल्याचे लक्षात आल्यामुळे बोरीकर यांनी अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदवली. एपीआय एस. एस. सुरोशे यांनी याप्रकरणी अनघाविरुद्ध गुन्हा दाखल केला. तिचा शोध घेतला जात आहे.(प्रतिनिधी)सिने अभिनेत्याचीही फसवणूक अनघाने यापूर्वी अशाच प्रकारे अनेक व्यापारी, उद्योजक आणि एका सिने अभिनेत्याचीही फसवणूक केल्याची चर्चा आहे. तिच्याविरुद्ध पुणे-मुंबईसह अनेक ठिकाणी गुन्हेही दाखल असल्याचे समजते.