शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दीडशेवर अधिकाऱ्यांची वाहने भररस्त्यात घेतली ताब्यात : ४० अधिकाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 21:05 IST

येत्या ११ एप्रिल रोजी नागपूर व रामटेक मतदारसंघाच्या निवडणूक कामाकरिता शासकीय वाहने देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. निवडणुकीसाठी ११०० वाहनांची आवश्यकता आहे. परंतु विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अशा प्रकारे टाळाटाळ करीत निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या विविध शासकीय विभागांच्या ४० पेक्षा अधिक प्रमुखांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच वाहन देण्यास टाळाटाळ करणाºया १५० अधिकाऱ्यांची वाहने रस्त्यावरच ताब्यात घेण्यात आली आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक कामाला वाहन देण्यात टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येत्या ११ एप्रिल रोजी नागपूर व रामटेक मतदारसंघाच्या निवडणूक कामाकरिता शासकीय वाहने देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. निवडणुकीसाठी ११०० वाहनांची आवश्यकता आहे. परंतु विविध विभागांकडून वाहन देण्यास टाळाटाळ केली जात आहे. अशा प्रकारे टाळाटाळ करीत निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱ्या विविध शासकीय विभागांच्या ४० पेक्षा अधिक प्रमुखांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच वाहन देण्यास टाळाटाळ करणाºया १५० अधिकाऱ्यांची वाहने रस्त्यावरच ताब्यात घेण्यात आली आहेत.लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी निवडणूक विभागाला ११०० वाहनांची आवश्यकता आहे. त्यात जीप, बस, ट्रक, अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशमनच्या वाहनांचा समावेश आहे. त्याकरिता आधी शासकीय कामे अडणार नाही या हिशेबाने काही शासकीय वाहने अधिग्रहित केली जात आहेत. तर उर्वरित वाहने कंत्राटी पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यानुसार वाहन अधिग्रहणाची कार्यवाही सुरू आहे. आजवर विभागाकडे जवळपास ३०० वाहने अधिग्रहित करण्यात आली आहेत. अनेक शासकीय विभागाच्या प्रमुखांना वारंवार पत्रव्यवहार व फोन करूनही ते आपल्या ताब्यातील वाहने देण्यात टाळाटाळ करीत आहेत. काही दिवस वाट पाहिल्यानंतर निवडणूक प्रशासनाने २५० पेक्षा अधिक विभागांना नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती आहे.सूत्रानुसार सार्वजनिक बांधकाम सिंचन विभाग, ऊर्जा विभाग आदी विभागातील जवळपास १५० मोठ्या अधिकाºयांकडून वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने वाहन जप्तीची मोहीम राबवण्यात आली. अधिकाºयांना रस्त्यावर थांबवून वाहनातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर ते वाहन भररस्त्यात जप्त करण्यात आले. ही वाहने आता निवडणूक विभागाच्या ताब्यात आहेत.राष्ट्रीय कामासाठी वाहन देण्यास टाळाटाळ होत असल्याने प्रशासनाने थेट गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सूत्रानुसार वाहन देण्यास टाळाटाळ करणाºया ४० वर विभागप्रमुखांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जाते. तसेच ज्या-ज्या विभागांनी आपापली वाहने जमा केली नाही, त्यांनी लवकरच ती वाहने निवडणूक विभागाकडे त्वरित जमा करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcarकार