शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

रोजगार हक्क कायद्यासाठी संसदेवर विशाल मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:04 IST

केंद्र शासनाने संविधानाच्या अनुच्छेद ४१ अंतर्गत बेरोजगारांना कामाचा हक्क देणारा कायदा करावा, या प्रमुख मागणीसाठी समाजक्रांती आघाडीतर्फे येत्या ११ फेब्रुवारी रोजी संसदेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजमीन हक्क व घर हक्काचाही लढा : ११ रोजी जंतरमंतरवर आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना शिक्षण घेऊनही त्यांच्या शिक्षणानुसार काम मिळत नाही. त्यामुळे केंद्र शासनाने संविधानाच्या अनुच्छेद ४१ अंतर्गत बेरोजगारांना कामाचा हक्क देणारा कायदा करावा, या प्रमुख मागणीसाठी समाजक्रांती आघाडीतर्फे येत्या ११ फेब्रुवारी रोजी संसदेवर विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष व संविधानाचे अभ्यासक अ‍ॅड मुकुंद खैरे हे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. अ‍ॅड. खैरे यांनी बुधवारी या आंदोलनाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, संविधानात रोजगाराच्या हक्काची तरतूद केली आहे, मात्र आजपर्यंत कोणत्याच सरकारने त्यानुसार कायदा केला नाही. रशिया, अमेरिका आणि जर्मनी आदी देशांनी कामाच्या हक्काचा कायदा केला असल्याने, त्या देशातील बेरोजगारी संपुष्टात आली आहे. बेरोजगारी कोणत्या धर्मापुरती मर्यादित नसून, देशात सर्व धर्मातील तरुण पदव्या घेऊनही काम मिळत नसल्याने होरपळत आहेत. काम मिळत नसल्याने पीएचडीसारख्या पदव्या घेणारे तरुण चपराशीच्या नोकरीसाठी रांगा लावत आहेत. ही स्थिती दूर करायची असेल तर रोजगार हक्क कायदा आणणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. या मागणीसह भूमिहीनांना जमिनीचा हक्क, बेघर लोकांना घराचा हक्क या मूलभूत गरजांसह बौद्धांचा स्वतंत्र कायदा करण्यात यावा, महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावे, या मागण्याही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारपुढे ठेवण्यात येणार आहेत. संविधानाने अनुच्छेद ३७ नुसार आर्थिक समानतेचा अधिकार दिला आहे. सरकार ‘सेज’सारखा कायदा करून कारखानदारांना जमिनी बहाल करते, त्याप्रमाणे भूमिहीनांसाठी कायदा करून जमिनी का दिल्या जात नाही, असा सवाल त्यांनी केला. घटनेने सर्व धर्मीयांना धर्म आचरणाचा अधिकार बहाल केला, मग बौद्धांचा कायदा का केला नाही, असा सवालही त्यांनी केला. या मागण्यांसाठी संसद भवनावर मोर्चा काढणार असून, लाखो लोक यात सहभागी होणार असल्याचा दावा अ‍ॅड. खैरे यांनी केला. पत्रपरिषदेला आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा चंद्रभागा पानतावणे, लालचंद लव्हात्रे, सारथीकुमार सोनटक्के, धनराज धोपटे, दीक्षा मोहोड, मधुकर मेश्राम, प्रवीण साखरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Morchaमोर्चाParliamentसंसदUnemploymentबेरोजगारी