शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘नाटा’च्या परीक्षेत प्रचंड गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 21:33 IST

नॅशनल अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्चर (नाटा) ची ऑनलाईन परीक्षा शहरातील दोन केंद्रावर घेण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणी आणि ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेत प्रचंड गोेंधळ उडाला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

ठळक मुद्दे तांत्रिक अडचणीबरोबरच सोशल डिस्टन्सिंगचाही उडाला फज्जा : विद्यार्थ्यांना झाला मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नॅशनल अ‍ॅप्टीट्यूड टेस्ट ऑफ आर्किटेक्चर (नाटा) ची ऑनलाईन परीक्षा शहरातील दोन केंद्रावर घेण्यात आली. परंतु तांत्रिक अडचणी आणि ढिसाळ नियोजनामुळे परीक्षेत प्रचंड गोेंधळ उडाला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांनाही मनस्ताप सहन करावा लागला.गोधनी रेल्वे येथील सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ लॉ आणि सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी या दोन केंद्रावर परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. एका एका केंद्रावर जवळपास ४०० ते ५०० विद्यार्थी परीक्षेसाठी आले होते. मुळात या परीक्षेसाठी दोन ऑप्शन देण्यात आले होते. मुलांनी घरून इंटरनेटची अडचण येऊ नये म्हणून सेंटरवर परीक्षा देण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे शनिवारी मोठ्या संख्येने विद्यार्थी परीक्षेसाठी पोहचले. पण या केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष करण्यात आले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कॉलेजकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. मुले स्वत:चे सॅनिटायझर घेऊन आले होते. मुलांची उपस्थिती पेपर संपल्यानंतर घेण्यात आली. दुपारी २.३० वाजता पेपर संपलेला असताना मुलांना थांबवून ठेवण्यात आले. अखेर काही पालकांनी जाब विचारीत व्हिडीओ शूटिंग सुरू केल्यानंतर दुपारी ३.३० ते ४ वाजता सोडण्यात आले. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथच्या पेपरसाठी रफ शीट देण्यात येणार होती. पेपर सुरू होऊन १० मिनिटे होऊन गेल्यानंतरही कॉलेज व्यवस्थापनाने रफ शीट दिलेली नव्हती, असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले. ‘नाटा’च्या सर्व्हर प्रॉब्लेममुळे अनेकांनी प्रश्नांवर क्लिक केल्यावरही उत्तर सबमिट होत नव्हते, अशा तक्रारी अनेक विद्यार्थ्यांनी केल्या. अनेक प्रश्न काही न करता सबमिट झाल्याने विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप झाला. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी परीक्षकांना विचारणा केली असता, त्यांनी हात वर केले. नाटाच्या पेपरचे एकूण दोन भाग होते. एका एका भागानंतर विद्यार्थ्यांना तीन मिनिटांचा ब्रेक होता. मात्र, गोंधळामुळे यात २० मिनिटे वाया गेली.

टॅग्स :examपरीक्षा