शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधितांच्या संख्येत घट मात्र संक्रमणाचा दर ९ टक्क्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:07 IST

सावनेर / काटोल / कळमेश्वर/ हिंगणा / उमरेड / रामटेक / नरखेड / कुही : नागपूर जिल्ह्यातील ...

सावनेर / काटोल / कळमेश्वर/ हिंगणा / उमरेड / रामटेक / नरखेड / कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या कमी होत असली तरी संक्रमणाचा दर अद्यापही ९ टक्क्यावर आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात २,१०८ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २०८ (९.८६ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ४ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १,४१,४२८ इतकी झाली आहे. १,३४,८७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २,२७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३,८७० इतकी आहे.

हिंगणा तालुक्यात २७६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी येथे १३, टाकळघाट (८) , कान्होलीबारा (६), हिंगणा (४), खडकी (३), भारकस (२) तर देवळी काळबांडे, जुनेवानी, निलडोह, बोरगाव, गुमगाव, उमरीवाघ, खैरी मोरेश्वर व सावंगी येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ११,८४६ इतकी झाली आहे. यातील १०,९१२ कोरोनामुक्त झाले तर २७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कळमेश्वर तालुक्यात १३ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न. प. क्षेत्रात ३ तर ग्रामीण भागातील १० रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात धापेवाडा येथे ३, मोहपा, खुर्सापार येथे प्रत्येकी दोन तर सांगवी मोहगाव, घोराड, म्हसेपठार येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.

सावनेर तालुक्यात ६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील २ तर ग्रामीण भागातील ४ रुग्णांचा समावेश आहे. कुही तालुक्यात १३४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात तितूर व अंबाडी येथे प्रत्येकी तीन, मांढळ (२) तर कुही येथे एका रुग्णाची नोंद झाली.

काटोल तालुक्यात ३८४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात १९ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ७ रुग्ण तर ग्रामीण भागातील १२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारी सावंगा केंद्रांतर्गत २, कोंढाळी (६) तर येनवा केंद्रांतर्गत मोडणाऱ्या गावात ४ रुग्णांची नोंद झाली.

रामटेक तालुक्यात केवळ ३ रुग्णांची नोंद झाली. तिन्ही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. तालुक्यात आतापर्यंत ६,५०५ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६,२१३ कोरोनामुक्त झाले तर २९२ रुग्णांचा मृत्यू झाला. उमरेड तालुक्यात ७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील १ तर ग्रामीण भागातील ६ रुग्णांचा समावेश आहे.

नरखेड ग्रामीणमध्ये धोका वाढला

नरखेड तालुक्यात रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ झाली आहे. तालुक्यात १९ रुग्णांची भर पडली. ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२० तर शहरातील २७ इतकी आहे. ग्रामीण भागात सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत (३), जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (६), मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्र (२) तर मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ८ रुग्णांची नोंद झाली.