शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

कसे मिळेल सुरक्षा कवच ?

By admin | Updated: June 1, 2015 02:46 IST

कधी पोलीस असल्याची बतावणी करून, कधी धाक दाखवून तर कधी वेगवेगळे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

नरेश डोंगरे  नागपूरकधी पोलीस असल्याची बतावणी करून, कधी धाक दाखवून तर कधी वेगवेगळे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जात आहे. वृद्धत्वामुळे असहाय बनलेल्या या बिचाऱ्यांना सहज लुटता येते, ते ध्यानात आल्यामुळे गुन्हेगारांनी ज्येष्ठ नागरिकांवर वक्रदृष्टी केली आहे. शुक्रवारी प्रतापनगरातील गंगादेवी आणि व्यंकटेश भोंडे यांच्या घरात दिवसाढवळ्या शिरून पिस्तूल तसेच चाकूचा धाक दाखवून लुटारूंनी दागिने लुटून नेले. तत्पूर्वी सोनेगाव ठाण्याच्या हद्दीत पौनीकर कुटुंबाकडे अशीच घटना घडली. या घटनांमुळे उपराजधानीतील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. पोलीस अधिकारी नेहमीच ज्येष्ठ दाम्पत्याच्या सुरक्षेचा दावा करतात. मात्र, वेळोवेळी घडणाऱ्या घटनांमधून तो दावा पोकळ असल्याचे उघड होते. १८, २१ आणि २२ मे रोजी घडलेल्या घटनांमधून पुन्हा त्याचा प्रत्यय आला. रवींद्रकुमार जोगेवार (७०, सुमितनगर) हे बीएसएनएलचे सेवानिवृत्त अधिकारी गुरुवारी २१ मेच्या सायंकाळी ते फेरफटका मारत होते. दोन आरोपी त्यांच्याजवळ आले. ‘आम्ही पोलीस आहोत. येथे लुटमारीच्या घटना सुरू आहेत . तुम्ही अंगावर दागिने घालून खुशाल फिरता. काही झाले की पोलिसांच्या नावाने ओरडता‘, असे म्हणत जोगेवार यांना धाकदपट केले. त्यानंतर त्यांच्याजवळची सोनसाखळी, ब्रासलेट, हातघड्याळ असा पावणेदोन लाखांचा ऐवज घेऊन पळून गेले.शुक्रवारी २२ मेच्या सकाळी १० वाजता कोतवालीत अशीच घटना घडली. विजय किशोर मुंदडा ( ७१, रा. गणेशनगर) हे रेशीमबागकडे जात होते. मोटरसायकलवर आलेल्या दोन आरोपींनी त्यांना रोखले. आम्ही सीआयडीचे अधिकारी आहोत, असे सांगून त्यांनी जबरीने मुंदडा यांच्या बॅगमधील दागिने लुटून नेले. याच दिवशी भोंडे यांच्या घरात शिरून लुटारूंनी भोंडे दाम्पत्याचे दागिने हिसकावून नेले. मौल्यवान चिजवस्तू आणि रोकड शोधण्यासाठी त्यांनी भोंडे यांच्या घरात धुडगूसही घातला. तत्पूर्वी, सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ मेच्या दुपारी थरारच घडला. निवृत्त बँक अधिकारी पुरुषोत्तम पवनीकर यांच्या घरात एक गुंड आला. घर बघायचे आहे, असे सांगून त्याने पवनीकर यांना वरच्या माळ्यावर नेले आणि त्यांच्या छातीत सुरा भोसकला होते.ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर लुटण्याचे प्रकार नेहमीचेच आहेत. आता घरात शिरून लुटारू त्यांना लुटू लागले आहे. त्यामुळे कुणीच नाही का आमच्या मदतीसाठी असा केविलवाणा सवाल, जेष्ठ नागरिक स्वत:च स्वत:ला विचारत आहेत. पोलिसांची भूमिकापोलिसांच्या रेकॉर्डनुसार उपराजधानीत एकूण ४०७० ज्येष्ठ नागरिक एकाकी आहेत. त्यातील १०० पेक्षा जास्त जणांची मुले विदेशात सेटल आहेत. अनेकांकडे केअर टेकरही आहेत. मात्र, तीन हजारांपेक्षा जास्त मंडळी अशी आहेत की ज्यांच्याकडे आयुष्याची जमापुंजी फारशी नाही. त्यामुळे एकाकीपणासोबतच ते रोजच्या जगण्यासाठीही संघर्ष करीत आहेत. त्यांना समाजकंटकाकडून त्रास होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात असलेल्या या हेल्पलाईनसाठी तीन पुरुष आणि एक महिला कर्मचारी नियुक्त आहेत. अडचणी सांगणाऱ्यांना तात्काळ मदत करण्याची, त्यांची नियमित वास्तपूस्त करण्याची जबाबदारी या ‘सेल‘वर आहे. हेल्पलेस हेल्पलाईनरात्रीबेरात्री काही अडचण आल्यास किंवा ज्येष्ठ नागरिकांना मदत हवी असेल तर त्यांना या हेल्पलाईनची मदत मिळेल याची शाश्वती नाही. कारण जबाबदारी असलेले कर्मचारी दिवसाच कामावर दिसतात. विशेष म्हणजे, अनेकदा दिवसा फोन करूनही हेल्पलाईन ‘नो रिप्लाय‘ असते. मोबाईल, व्हॉटस्अपमध्ये गुंतलेल्या एका कामचुकार कर्मचाऱ्याने ज्येष्ठ नागरिकांचे सारखे वाजणारे फोन टाळण्यासाठी एक शक्कल लढवली. या कर्मचाऱ्याने लॅण्डलाईन फोनचे बटन साईलेंट मोड वर टाकले. परिणामी त्या फोनचा आवाजच येत नाही. तक्रारी वाढल्यानंतर हेल्पलाईनमधीलच एका दुसऱ्या कर्मचाऱ्याने ही ‘कामचुकारी’ पकडली. त्याने शनिवारी तो फोनच काढून फेकला. त्या ठिकाणी दुसरा नवा फोन लाण्यात आला.