शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनने कोंडीत सापडलेला शेतकरी जगेल कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST

अमोल काळे काटोल : कोरोनाने जग थांबले. लॉकडाऊनने शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ...

अमोल काळे

काटोल : कोरोनाने जग थांबले. लॉकडाऊनने शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले. दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसला. त्यामुळे येथील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. ग्रामीण भागात एप्रिल महिन्यापासून संचारबंदी लागू केली आहे. आता खरीप हंगाम तोंडावर असताना व्यापारी वर्गासह शेतकरीसुद्धा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. दोन महिने लॉकडाऊन झाल्यानंतर जून महिन्यात काय पहायला मिळेल, याचा अद्यापही थांगपत्ता नाही. खरीप हंगामात बी-बियाणे आणि खतांसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी त्रस्त झाला आहे. तालुक्यातील मजूरवर्ग मिळेल तिथे काम शोधत आहे. इकडे खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. काटोल तालुक्याची लोकसंख्या ही दोन लाखांच्या जवळपास आहे. यातील ६० टक्के लोक शेतीवर निर्भर आहेत. त्यामुळे कोरोनामुळे डबघाईला उभारी देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.

कर्जासाठी भटकंती

गत हंगामातील बोनससुद्धा अनेक शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेला नाही. बऱ्याच शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकित राहिले. पात्र, शेतकरी दिवस-रात्र एक करीत कर्जाकरिता सरसावले आहेत. हाती पैसा नसल्याने मिळेल तिथून पैशाची जमवाजमव सुरू आहे.

---

बी-बियाणे व खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकरी त्रस्त आहे. गतवर्षी अवकाळी पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे शेतीमाल बेभाव विकावा लागला. हीच परिस्थिती आताही कायम आहे.

-बाबाराव काळे, शेतकरी, चिखली (मैना)

--

लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले. वेळोवेळी बदलणाऱ्या निर्बंधांमुळे आमच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. नवीन मालाची आवक थांबल्याने व ग्राहक संतुष्ट होत नसल्याने व्यापार बुडतो आहे.

गौरव ठाकरे, दुकानदार

---

गतवर्षी सततच्या पावसाने खरीप हंगामात शेतकऱ्यांना फटका बसला. रबी हंगामात शेतकरी सावरत नाही तोच त्याला लॉकडाऊनच्या निर्बंधांना सामोरे जावे लागले. बाजार भाव हवा तसा मिळाला नाही.

- सुरेश कन्नाके

तालुका कृषी अधिकारी, काटोल