शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

‘स्वच्छ भारत’ कसा होईल?

By admin | Updated: November 9, 2014 00:50 IST

देशात सर्वत्र ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविली जात असताना ती एसटी महामंडळाने अद्याप राबविली की नाही, असा प्रश्न बसेसमधील अस्वच्छता पाहून पडतो. बसेसमध्ये अस्वच्छता, सीट फाटलेल्या,

एसटी बसमध्ये अस्वच्छता : दुर्गंधीमध्ये करावा लागतो प्रवासअभय लांजेवार - उमरेडदेशात सर्वत्र ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविली जात असताना ती एसटी महामंडळाने अद्याप राबविली की नाही, असा प्रश्न बसेसमधील अस्वच्छता पाहून पडतो. बसेसमध्ये अस्वच्छता, सीट फाटलेल्या, खुलेआम धूम्रपान केले जात असल्याने प्रवाशांचा जीव गुदमरतो. परंतु, त्यानंतरही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना हव्या त्या सुविधा देत असताना एसटी महामंडळ मात्र आहे ती स्थिती सुधारण्यास तयार नसल्याने महामंडळाला तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. शहर असो वा गावखेडे तेथे जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महामंडळाच्या गाड्यांवरच प्रवासाचे गणित अवलंबून आहे. तिकिटाचे दर वाढले म्हणून कुरकुर करणारा सर्वसामान्य माणूस नेहमीच प्रवास करण्यासाठी एसटी बसला प्राधान्य देतो. मात्र बरेचदा त्याचाही येथील गैरसोयीमुळे नाईलाज होत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात अवैध वाहतूक फोफावली अशी ओरड सर्वच स्तरातून केली जाते. याला बऱ्याच अंशी एसटी महामंडळाचा कारभारच जबाबदार असल्याचे दिसते. ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसकडे कोणाचे लक्ष नाही. या बसमधून प्रवास करताना अनेक असुविधा दिसून येतात. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची नियमित स्वच्छताच केली जात नाही. गाडीमध्ये साचलेल्या घाणीमुळे अगदी जीव नकोसा होतो. अनेकांना तर ही दुर्गंधी सहन होत नसल्याने सातत्याने उलट्या होतात. बसमध्ये चढताक्षणीच दाराचा कोपरा पानांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला दिसतो. तेथून घाणीला सुरुवात होते. खिडक्या या उलटीने माखलेल्या असतात. वेफर्स, चिप्स खाऊन त्याचे पॅकेट संपूर्ण बसमध्ये उडत असतात. बसमध्ये मोठ्याप्रमाणात माती साचलेली असते. एखादी व्यक्ती चालू गाडीतच मनसोक्त धुम्रपान करता दिसतो. गर्दीने खचाखच भरलेल्या गाडीमध्ये हा धूर कोंडल्याने सर्वांनाच धूम्रपान घडते. हा प्रकार थांबविण्याची तसदी गाडीतील वाहक कधीच घेत नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणेही कायद्याने निषिध्द आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही. बसमध्ये बसून धूम्रपान केले अथवा थुंकले, कचरा टाकला म्हणून कोणालाही आजपर्यंत दंड झाला नाही. त्यामुळे प्रत्येक जण बेफामपणे कोणाचीही पर्वा न करता एसटी बस रंगविण्याचे काम प्रवासादरम्यान करतो. कर्तव्यावर असलेल्या वाहकाने पुढाकार घेऊन अशा प्रवाशांची तक्रार केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार करवाई करण्याची तरतूद आहे. मात्र वाहक अशी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळेच लोकवाहिनी असलेली एसटीबस आज घाणीच्या विळख्यात सापडली आहे. शिवाय बसच्या तुटक्या सीट, फुटलेल्या खिडक्या ही तर नित्याचीच बाब झाली आहे. आज सर्वत्र स्वच्छतेचा नारा दिला जात असताना एसटी महामंडळाला अजून तरी जाग आलेली दिसत नाही. एसटीसाठीसुद्धा स्वतंत्र स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. बसेसच्या स्वच्छतेची जबाबदारी ही महामंडळाप्रमाणेच प्रवाशांवरही अवलंबून आहे. नियमित स्वच्छता झाल्यास प्रवासीसुद्धा बस अस्वच्छ करण्यास मागेपुढे पाहील. त्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. राखीव जागेवर अतिक्रमण ४सटी महामंडळाच्या बसेसमध्ये खासदार, आमदार, ज्येष्ठ नागरिक, महिला, पत्रकार, अपंग, एसटी महामंडळाचे कर्मचारी आदींसाठी आसन राखीव असते. यापैकी खासदार - आमदार एसटी महामंडळाच्या बसेसने कधीच प्रवास करीत नाही. त्यामुळे त्यांच्या राखीव जागेवर कुणीही बसू शकतो. परंतु, महिलांसाठी राखीव असलेल्या सीटवर बऱ्याचदा पुरुष आसनस्थ होतात आणि गर्दीमध्ये महिला मात्र उभ्या राहून प्रवास करतात. अशाचप्रकारे ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, अपंग आदींसाठी जागा राखीव असताना त्या सीटवर भलतेच प्रवासी बसतात. ही मानसिकता बदलविण्याची गरज आहे. यासाठी संबंधित बसमधील वाहकाने प्रवाशांना त्या सीटवरून उठविल्यास असे प्रकार पुन्हा घडणार नाही. फाटलेल्या सीटउमरेड आगारात एकूण ५६ एसटी बसेस आहेत. गडचिरोपासून ते अकोला, पुसद, अहेरी अशा लांब पल्ल्याच्या गाड्याही येथून धावतात. प्रवास जवळचा असो वा लांबचा अनेकदा प्रवाशांना मात्र फाटलेल्या सीटचरच आसनस्थ होऊन प्रवास करावा लागतो. एसटी बसमधून सर्वच प्रकारचे प्रवाशी प्रवास करतात. बसमध्ये असलेल्या असह्य घाणीमुळे वृद्ध आणि विशेषत: लहान मुलांना या घाणीमुळे संसर्ग होण्याची भीती आहे. एक प्रकारे एसटीतील अस्वच्छता ही मोठ्या प्रमाणात रोगराईला आमंत्रण देणारी ठरत आहे.