शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रक्रियेविना शहर कचरामुक्त कसे होणार

By admin | Updated: May 10, 2017 02:33 IST

स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे.

कचरा प्रकल्पाकडे दुर्लक्ष : कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग आहे. घराघरातून संकलित करण्यात येणाऱ्या कचऱ्याची १०० टक्के विल्हेवाट लावणे महापालिकेचे कर्तव्य आहे. म्हणूनच यासाठी बृहत् आराखडा (डीपीआर)तयार करण्यात आला होता. शहरातून दररोज संकलित करण्यात येणाऱ्या ११०० मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाणार होती परंतु हा प्रकल्प रखडला. त्यामुळे प्रक्रियाच होत नसल्याने शहर कचरामुक्त कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी मे. कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट या एजन्सीकडे सोपविण्यात आली आहे. यासाठी कचऱ्याचे विलगीकरण करण्यात येणार आहे. परंतु महापालिकेकडे घनकचऱ्यावर प्रकिया करण्याची सक्षम यंत्रणा नाही. हंजर प्रकल्प आहे. परंतु याची क्षमता जेमतेम २०० मेट्रिक टन आहे. उर्वरित ९०० मेट्रिक टन कचरा प्रक्रिया न करताच भांडेवाडी येथे साठविला जातो. महापालिकेने २००९ मध्ये भांडेवाडी येथील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी हंजर बायोटेक कंपनीकडे सोपविली होती. यात करारानुसार ६०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया अपेक्षित होती. परंतु सध्या या प्रकल्पात जेमतेम २०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढण्याची शक्यता कमी आहे. प्रकल्पाचा प्रस्ताव रखडला ८०० मेट्रिक टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने दोन वर्षापूर्वी निविदा मागिविल्या होत्या. परंतु एकच निविदा आली होती. या प्रकल्पाच्या वित्तीय बाबी तपासण्यात आल्या होत्या. परंतु पुढे हा प्रस्ताव थंड बस्त्यात पडला आहे. यामुळे नवीन आॅपरेटरची नियुक्ती रखडली आहे. त्यामुळे नवीन आॅपरेटरची नियुक्ती कधी होणार असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे. १०० टक्के प्रक्रिया कधी होणार? स्वच्छतेच्या यादीत नागपूर शहराचा क्रमांक घसरला आहे. याला अनेक कारणे आहेत. यात शहरातून संकलित करण्यात येणाऱ्या कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया न होणे हेही यातील एक महत्त्वाचे कारण आहे. हंजर प्रकल्पाची क्षमता नसल्याने नवीन प्रकल्प तातडीने सुरू करणे अपेक्षित होते. परंतु प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही.