शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

गॅस अनुदान बंद करून अच्छे दिन कसे येणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:58 IST

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान ....

ठळक मुद्देअनिल देशमुख यांचा सवाल : मोठे आंदोलन उभारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून केंद्रात व राज्यात भाजपाने सत्ता मिळविली. मात्र, सरकारचे लोकहितविरोधी निर्णय घेणे सुरू आहे. केंद्र सरकारने पुढील वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत घरगुती गॅस सिंलेडवर मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच घरगुती सिलेंडरचे भाव ७ रुपयांनी वाढविले आहे. हेच अच्छे दिन आहेत का, असा सवाल करीत अनुदान बंद केले व दरवाढ रद्द केली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.देशमुख म्हणाले, सद्यस्थितीत एका घरगुती सिंलेडरमागे १५० रुपये अनुदान देण्यात येते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार असताना मी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचा मंत्री असताना घरगुती गॅस सिलेंडवर मिळणारे अनुदान थेट ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करणारी योजना सुरु केली होती. परंतु आता भाजपा सरकार सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आुदान सोडण्याचे आवाहन केले. गरीब कुटुंबांना उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस कनेक्शन देण्यासाठी त्यांनी हे आवाहन केले होते. परंतु याही योजनेच्या माध्यमातून गरीब जनतेला फसविण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. जोपर्यंत कनेक्शनचे १६०० रुपये पूर्ण जमा होणार नाही तोपर्यंत सिलेंडरची सबसिडी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गॅस सिलेंडरसारखीच केरोसीनची सुध्दा सबसिडी बंद करण्याचे सरकारचे धोरण आहे. २०१६ पासून दर १५ दिवसाला २५ पैसे भाववाढ करण्यात येत आहे. शिवाय देशातील अनेक भाग केरोसीनमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील कोट्यवधी गरीब कुटुंबास याचा फटका बसणार आहे. एकीकडे मोठमोठ्या उद्योगपतींचे हजारो करोड रुपयाचे कर्ज माफ करायचे आणि दुसरीकडे गरीब जनतेला देण्यात येणारे अनुदान बंद करायचे हे कसले धोरण आहे. भाजपाने सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.