शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

प्रमाणपत्र नसतानाही एम्प्रेस मॉल सुरू कसा ?

By admin | Updated: November 3, 2016 03:37 IST

महापालिकेने दिलेली मंजुरी, शासन निर्णय तसेच नियम धाब्यावर बसवून एम्प्रेस मॉलमध्ये अतिरिक्त

नियमांची पायमल्ली : मनपाच्या नोटीसला केराची टोपली नागपूर : महापालिकेने दिलेली मंजुरी, शासन निर्णय तसेच नियम धाब्यावर बसवून एम्प्रेस मॉलमध्ये अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेले आहे. एवढेच नव्हे तर कोणत्याही इमारतीचे बांधकाम केल्यानतंर व्यावसायिक वापर सुरू करण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र व अग्निशमन विभागाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असते. परंतु मे.के. एस.एल.आणि इंडस्ट्रीज लि. यांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र न घेता एम्प्रेस मॉलचा व्यावसायिक वापर सुरू केला आहे. महापालिकेच्या धंतोली झोनचे उपअभियंता यांनी ७ जानेवारी २०१५ रोजी याबाबत एम्प्रेस मॉल व्यवस्थापनाला नोटीस बजावली होती. बांधकाम नकाशाला मंजुरी नाही इमारतीचे बांधकाम करताना नियमानुसार नगररचना विभागाची मंजुरी घ्यावी लागते. परंतु एम्प्रेस मॉलमधील खुल्या जागेवर अतिक्रमण करू न बांधकाम करण्यात आले आहे. तसेच भूखंड २ व ५ येथे मंजूर नकाशानुसार बांधकाम न करता अतिरिक्त बांधकाम करण्यात आलेले आहे. नोटीस बजावल्यानंतरही भूखंड २ वरील अतिरिक्त बांधकाम हटविण्यात आलेले नाही. त्यामुळे मे.के. एस.एल.आणि इंडस्ट्रीज लि. यांनी मंजुरीसाठी सादर केलेला नकाशा नगररचना विभागाने परत पाठविला होता.