शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ट्रायल रन मेट्रोतून सिंधू व गोपीचंदचा प्रवास कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:37 IST

आंतरराष्ट्रीय स्तराचे बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांच्यासह अन्य बॅडमिंटन खेळाडू मंगळवारी मेट्रो रेल्वेने साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून मिहान डेपोमध्ये पोहोचले.

ठळक मुद्देदुर्दैवी घटना घडली असती तर कोण असते जबाबदार?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंतरराष्ट्रीय स्तराचे बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांच्यासह अन्य बॅडमिंटन खेळाडू मंगळवारी मेट्रो रेल्वेने साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून मिहान डेपोमध्ये पोहोचले. ट्रायल रनवर धावणाºया या रेल्वेतून पाच कि़मी.चा प्रवास करताना एखादी दुर्दैवी घटना घडली असती तर त्यासाठी कुणाला जबाबदार धरले असते आणि महामेट्रो देशातील या महान खेळाडूंना अखेर ट्रायल रन मेट्रोतून कसे नेले? या प्रश्नांचे उत्तर नागरिक विचारत आहेत.नागपुरात आयोजित ८२ व्या सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिपकरिता आलेले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेडाळू पी.व्ही. सिंधू, मुख्य राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद, किदकम्बी श्रीकांत, पारुपल्ली कश्यप आणि साई प्रणीत मंगळवारी मेट्रोच्या मिहान डेपोमध्ये पोहोचले होते. त्यासाठी त्यांनी साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनवरून मेट्रो रेल्वेने पाच कि़मी.चा प्रवास केला होता.नागपुरात मेट्रो रेल्वेचे सध्या ट्रायल रन सुरू आहे. रिसर्च डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशनची(आरडीएसओ)चमू यावर लक्ष ठेवून आहे. आरडीएसओकडून हिरवी झेंडी आणि कमिश्नर आॅफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची(सीएमआरएस)मंजुरी मिळाल्यानंतरच मेट्रो व्यावसायिकरीत्या धावणार आहे. मेट्रोची रेल्वे, अ‍ॅटग्रेड सेक्शन अर्थात ५.६ कि़मी.चा ट्रॅक, वीज पुरवठा व्यवस्था नवीन आहे आणि त्याची प्रत्येक स्तरावर तपासणी सुरू आहे. अशास्थितीत देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाºया बॅडमिंटन खेळाडूंना या नवीन ट्रॅकवर नवीन मेट्रो रेल्वेमध्ये प्रवास करून महामेट्रोने त्यांच्या सुरक्षेसंदर्भातील नियमांचे उल्लंघन तर केले नाही ना? हा प्रश्न जनतेकडून उपस्थित करण्यात येत आहे.याप्रकरणी मत जाणून घेण्यासाठी महामेट्रोचे महाव्यवस्थापक अनिल कोकाटे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मेट्रो रेल्वेची हैदराबाद येथे पूर्वीच तपासणी झाली असून आवश्यक प्रमाणपत्र मिळाले आहे. नागपुरात आरडीएसओचा ट्रायल रन पूर्ण झाला आहे. खेळाडूंना ८० कि़मी. प्रति तास वेगाऐवजी १० ते १५ कि़मी. प्रति तास वेगाने मेट्रोने नेण्यात आले. यादरम्यान मेट्रोची सक्षम चमू सोबत होती.होर्डिंग ‘जैसे थे’, नव्याने लागलेमेट्रो पिलर्सचे विद्रूपीकरण अद्याप थांबलेले नाही. महामेट्रोने या पिलर्सवर सिनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे होर्डिंग लावले. हे होर्डिंग अजूनही हटलेले नाही तर त्याच्या बाजूला स्थानिक आमदाराने आपले होर्डिंग नव्याने लावले आहेत. अजनी चौक परिसरात मेट्रो पिलर्सवर हे होर्डिंग झळकत आहेत. विद्यार्थी दिवसाची शुभेच्छा देणाºया या होर्डिंगवर आमदाराचे नाव नमूद आहे.