शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

कशी घेणार ‘गरुड’ झेप ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 02:48 IST

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी कामाला लागली आहे. ज्येष्ठ नेते दिवस-रात्र

संघटन आहे कुठे ? : बसपा प्रदेशाध्यक्षांचा सवालनागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टी कामाला लागली आहे. ज्येष्ठ नेते दिवस-रात्र संघटना बांधणीवर भर देत आहेत. नागपुरात बसपा महापौर बनाओ अभियान राबविणार आहे. परंतु नागपूर शहर व जिल्ह्याच्या संघटनेची बांधणीच अजून पूर्ण झाली नसल्याची बाब रविवारी उघडकीस आली. खुद्द प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी यासंदर्भात भरसभेत जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली. बसपाने महाराष्ट्रात आजवर विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपला एकही उमेदवार निवडून दिला नसला तरी, मजबूत संघटनेच्या जोरावर बसपा विशेषत: विदर्भामध्ये एक सक्षम पर्याय म्हणून नेहमीच राहिलेला आहे. आजवर अनेक नेते आले आणि गेले परंतु बसपाच्या संघटनेवर विदर्भात तरी त्याचा कधीही परिणाम झालेला नाही. परंतु यावेळचे चित्र मात्र उलटे आहे. पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेले डॉ. सुरेश माने यांनी पक्ष सोडल्यापासून बसपाच्या संघटनेलाच खीळ बसली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते ही बाब जाहीररीत्या मान्य करायला तयार नाहीत. मात्र बसपाचे राष्ट्रीय महासचिव व महाराष्ट्र प्रभारी खा. वीरसिंह आणि प्रदेशाध्यक्ष विलास गरुड मागील सहा महिन्यांपासून ज्या पद्धतीने विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दौरा करीत फिरत आहेत, त्यावरून विदर्भात संघटनेला मोठ्या प्रमाणावर खीळ बसल्याचे दिसून येते. हे दोन्ही ज्येष्ठ नेते संघटना बांधणीसाठी दिवस-रात्र एक करीत आहेत. परंतु तरीही संघटना बांधणी अजूनही पूर्ण झाली नाही, याचे चित्र रविवारी दिसून आले. रविवारी पक्षातर्फे राजर्षी शाहू महराज यांच्या जयंतीनिमित्त माहेश्वरी सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रदेशाध्यक्ष गरुड यांनी संघटना बांधणीचा आढावा घेतला. नागपूर शहर व जिल्ह्यातील विधानसभानिहाय आढावा घेतला. प्रत्येक विधानसभेतील पदधिकाऱ्यांना उभे राहण्यास सांगण्यात आले. यावेळी विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांची संख्या विचारात घेता संघटन बांधणी अजूनही झाली नसल्याची बाब गरुड यांच्या नजरेतून सुटली नाही. त्यांनी याबाबत जाहीरपणेच आपली नाराजी व्यक्त केली. महापुरुषांची जयंती साजरी करीत आहोत, पण संघटना बांधणी तयार नाही, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.राष्ट्रीय महासचिव आणि प्रदेशाध्यक्षांच्या समोरच नागपूरचे पदधिकारी संघटना बांधणीबाबत उघडे पडले. तेव्हा अजूनपर्यंत संघटना बांधणीच नाही, तर बसपाचा हत्ती धावणार कसा, असा प्रश्न येथे आलेल्या सामान्य कार्यकर्त्यांना पडला होता. (प्रतिनिधी)