शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक कशी थांबवाल

By admin | Updated: December 8, 2015 03:55 IST

गुंतवणूकदारांची फसवणूक थांबविण्यासाठी राज्य शासन काय उपाययोजना करीत आहे, अशी विचारणा मुंबई उच्च

हायकोर्टाची विचारणा : महाधिवक्त्यांना मागितली माहितीनागपूर : गुंतवणूकदारांची फसवणूक थांबविण्यासाठी राज्य शासन काय उपाययोजना करीत आहे, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी करून यावर महाधिवक्त्यांमार्फत ११ डिसेंबर रोजी माहिती सादर करण्याचे निर्देश दिले.शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकरची पत्नी भाग्यश्री व भाऊ विनय यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायालयाने हा मुद्दा उपस्थित केला. प्रकरणावर न्यायमूर्ती अरुण चौधरी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. भाग्यश्रीने नागपुरातील अंबाझरी व अमरावतीतील फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी दोन वेगवेगळे अर्ज सादर केले आहेत. विनयनेही असेच दोन अर्ज केले होते. काही दिवसांपूर्वी त्याला अमरावतीतील गुन्ह्यात जामीन मिळाला. त्याचा नागपुरातल्या गुन्ह्यातील अर्ज प्रलंबित आहे. दोन्ही आरोपींच्या अर्जांवर एकत्र सुनावणी करण्यात येत आहे.वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने वार्षिक ४० ते ५० टक्के व्याजाचे आमिष दाखवून मासिक, तिमाही, वार्षिक, द्विवार्षिक, १८ महिने, ३३ महिने, ४८ महिने इत्यादी मुदतीच्या आकर्षक योजनांतर्गत गुंतवणूकदारांच्या मोठमोठ्या ठेवी स्वीकारल्या. यानंतर कंपनीने मुदत संपूनही ठेवी परत केल्या नाहीत आणि आश्वासनानुसार परतावाही दिला नाही. भाग्यश्रीने वासनकर वेल्थ मॅनेजमेंटचा पैसा स्वत:च्या खात्यात वळवून ५ कोटी ५८ लाख रुपये किमतीचे शेअर्स खरेदी केले होते. ती परिधी ट्रेडिंगची संचालक होती.(प्रतिनिधी)