शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
3
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
4
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
6
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
7
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
8
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
9
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
10
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
11
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
12
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
13
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
14
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
15
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
16
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
17
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
18
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
19
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
20
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा

कसा राहणार पोलिसांवर ‘भरोसा’?

By admin | Updated: June 30, 2017 02:53 IST

मागीलवर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी तिघांचा ‘स्टाफ’ : सव्वापाच वर्षांत केवळ साडेतीन हजार नागरिकांना ‘कार्ड’वाटपलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागीलवर्षी ज्येष्ठ नागरिकांवरील झालेल्या प्राणघातक हल्ल्यांच्या घटनांमुळे शहर हादरले होते. गेल्या काही काळापासून ज्येष्ठ नागरिकांच्यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. मात्र तरीदेखील पोलीस प्रशासनाने यातून बहुतेक धडा घेतलेला नाही. म्हणूनच की काय ‘भरोसा सेल’मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी अवघ्या तीन जणांचा ‘स्टाफ’ कार्यरत आहे. विशेष म्हणजे शहरात लाखो ज्येष्ठ नागरिक असताना मागील सव्वापाच वर्षांत केवळ साडेतीन हजारांच्या आसपासच नागरिकांचे ‘कार्ड’ तयार करण्यात आले आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेकडे विचारणा केली होती. भरोसा सेलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले ‘कार्ड’ तसेच दामिनी पथकाला देण्यात आलेल्या सुविधा इत्यादींबाबत त्यांनी विचारणा केली होती. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी ‘भरोसा सेल’मध्ये केवळ एक अधिकारी व दोन कर्मचारी कार्यरत आहेत. ‘भरोसा सेल’तर्फे ज्येष्ठ नागरिकांना विशेष ‘कार्ड’ देण्यात येते. १ जानेवारी २०१२ ते ३० एप्रिल २०१७ या कालावधीत पोलीस विभागातर्फे केवळ ३,६६२ ज्येष्ठ नागरिक ‘कार्ड’ वितरित करण्यात आले. तर या कालावधीत केवळ ३७२ नागरिकांना प्रत्यक्ष मदत देण्यात आली. मागील पाच वर्षात चक्क ३८ ज्येष्ठ नागरिकांची हत्या करण्यात आली. तर फसवणूक व मारहाणीचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेवर विशेष भर देण्यात येईल, असा दावा अधिकाऱ्यांतर्फे करण्यात आला होता.अशा स्थितीत माहितीच्या अधिकारातील ही आकडेवारी पोलिसांच्या दाव्यांची ‘पोलखोल’ करणारीच आहे.