शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कशी हवी ‘स्मार्ट सिटी’ ?

By admin | Updated: October 11, 2015 02:54 IST

सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ नागपूरसह ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावर नागपूर महानगरपालिका काम करीत आहे.

मनपा येणार आपल्या दारी : एक हजार कर्मचारी नोंदविणार नागरिकांच्या सूचनानागपूर : सुंदर, सुरक्षित आणि स्वच्छ नागपूरसह ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पावर नागपूर महानगरपालिका काम करीत आहे. मात्र, नागपूरकरांना स्मार्ट सिटी कशी हवी आहे, हे जाणून घेण्यासाठी आता महापालिकेचे सुमारे एक हजार कर्मचारी घरोघरी जाणार आहेत. नागरिकांच्या सूचना ऐकून त्याची नोंदही करणार आहेत. यासाठी १३ ते १८ आॅक्टोबरदरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांकडून येणाऱ्या या सूचनांचा एक डाटाबेस तयार करून ‘व्हिजन डॉक्युमेंट’ तयार केले जाईल. केंद्र सरकारला सोपविण्यात येणाऱ्या या प्रकल्प प्रस्तावात त्या सूचनांचाही समावेश केला जाईल.महापौर प्रवीण दटके यांनी या मोहिमेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, ‘स्मार्ट सिटी प्रकल्प’ नागरिकांसाठीच तयार केला जात आहे. तेव्हा त्यांना दुर्लक्षित करता येणार नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी चांगल्या व योग्य सूचना मागविण्यात आल्या होत्या. १४०० च्या जवळपास सूचना आॅनलाईन व आॅफलाईन आल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये नागरिकांची मते जाणून घेणे आवश्यक आहे. त्याचे क्रेडिट पॉर्इंट मिळतील. कर्मचारी घरोघरी जाऊन अर्ज भरून घेतील. त्यात नाव, पत्ता आणि सूचनांचे विकल्प असतील. एखाद्या व्यक्तीला स्वतंत्रपणे सूचना द्यायची असेल तर तो ती सूचना त्या फॉर्मसह जोडू शकतो. प्रत्येक सूचनेला गांभीर्याने घेतले जाईल. नागरिकांच्या म्हणण्यानुसारच शहराला स्मार्ट करावयाचे आहे. जो डाटा तयार होईल, त्याचा डाटा बेस तयार करण्यासाठी महाविद्यालयांची मदत घेतली जाईल. स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ९० दिवसांचा अवधी मिळाला आहे. १५ डिसेंबरपूर्वी पूर्ण प्रकल्पावरील काम व्यवस्थितपणे पूर्ण केले जाईल. राहिली गोष्ट वर्षाला ५० कोटी रुपये जमविण्याची तर त्यासाठी राज्य सरकारची मदत, वित्त संस्थांकडून कर्ज आदी पर्यायांवरही चर्चा सुरू आहे. स्मार्ट सिटीसाठी आलेल्या प्रस्तांवाची छाननी सुरू आहे. लवकरच सर्वश्रेष्ठ २० प्रस्तांवाची निवड केली जाईल. या दरम्यान वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. यासाठी एक बैठक आयोजित करण्यात येत आहे. प्रोजेक्ट तयार करण्यासाठी क्रिसिल कंपनीला अधिकृत करण्यात आले आहे. सोबतच लोकांकडून अर्ज भरण्याच्या अभियानात डिलिवरिंग चेंज फाऊंडेशनची मदत घेतली जाईल. पत्रकार परिषदेला उपमहापौर मुन्ना पोकुलवार, स्थायी समिती अध्यक्ष रमेश सिंगारे, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी उपस्थित होते. स्मार्ट सिटीसाठी वॉर रूम तयारनागपूर : विशेष अभियानाला प्रभावीपणे आणि जलदगतीने पूर्ण करण्यासाठी मनपा आयुक्त कार्यालयाजवळील ‘व्हिजिटर रूम’ला ‘वॉर रूम’ म्हणून तयार करण्यात आले आहे. यात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, क्रिसिलचे कर्मचारी, मनपाचे कर्मचारी कॉम्प्युटरमध्ये डाटा एन्ट्रीचे काम करतील. सात लाख अर्ज छापण्यात येत आहे. पाच लाख घरांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले आहे. असा आहे अर्ज अर्जात लिहिले आहे ‘प्रिय नागपूरकर आपले नागपूर स्मार्ट सिटी होणार आहे. आपल्या नजरेत ‘स्मार्ट सिटी’चा खरा अर्थ काय आहे. हे समजल्यानंतरच या दिशेने पुढची दिशा निश्चित होईल. आपण आपली अमूल्य दोन मिनिटे देऊन हा अर्ज भरावा. यामध्ये पूर्ण विवरण दिले आहे. यात स्वच्छता, ग्रीनरी, संतुलित विकास, समृद्धी, डिजिटल कनेक्ट, सुरक्षा व इतर पर्यायांबाबत विचारणा करण्यात आली आहे. सोबतच रोजगाराच्या संधी, महिला सुरक्षा, पाण्याची उपलब्धता, कचरा, खेळ, आरोग्य आदींबाबतही प्रश्न विचारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)