लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खतांची विक्री करण्यात येते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्हास्तरावर एक असे १४ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मात्र भरारी पथकाजवळ वाहनच नसल्याने बोगसगिरीवर कसा आळा बसणार असा सवाल निर्माण होत आहे.खरीप हंगामासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग सज्ज झाला आहे. खरीपासाठी जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा ५ लाख ६ हजार ७०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे. याशिवाय बियाणे व खतांचेही नियोजन विभागाकडून करण्यात आले आहे. आवश्यक बियाणे आणि खतांची उपलब्धता झाली असून, कृषी सेवा केंद्रातून या वस्तूंचे वितरण होताना गैरप्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. जिल्हा स्तरावरावरील भरारी पथकात जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख हे भरारी पथकाचे अधिकारी आहे. तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी या पथकांचे प्रमुख आहेत. खतांचे पारदर्शकपणे वितरण करणे, शासकीय किमतीत खताची विक्री होते की नाही, अवैध साठा हुडकून काढणे, तक्रारींचे निवारण करणे आदी कर्तव्य या पथकाला पार पाडावी लागणार आहेत. मात्र, जिल्हास्तरीय भरारी पथकाला शासनाकडून वाहनच उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. राज्य शासनाचा कृषी विभाग, ग्राम विकास विभागही या जिल्हास्तरीय पथकाला वाहन उपलब्ध करून देण्यातही अपयशी ठरल आहे. असे असतानाही आजवर या जिल्हास्तरीय पथकाने बोगस बियाणांची साठवणूक करणाऱ्या चार प्रकरणाचा पदार्फाश केला आहे. यात एकूण २१ लाख ६८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पथकाला यश आले आहे. मात्र त्यांच्या या कामाची शासनस्तरावरून दखल घेतली जात नसल्याचे दिसते आहे.
बोगस बियाणे, खतांवर कसा बसणार आळा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 00:01 IST
खरीप हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, खतांची विक्री करण्यात येते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथकाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्हास्तरावर एक असे १४ भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. मात्र भरारी पथकाजवळ वाहनच नसल्याने बोगसगिरीवर कसा आळा बसणार असा सवाल निर्माण होत आहे.
बोगस बियाणे, खतांवर कसा बसणार आळा ?
ठळक मुद्देजिल्हास्तरीय भरारी पथक वाहनाविना