शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

मेयोमध्ये रुग्णांची संख्या कमी कशी? संचालक लहानेंची अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:31 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (मेयो) होणारा खर्च पाहता रुग्णांची संख्या कमी कशी, असा थेट प्रश्न विचारत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मेयोची उलटतपासणी केली. रुग्णसंख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी त्यांनी मेडिकल व मेयो रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीने दोन्ही रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली.

ठळक मुद्देमेडिकलचीही केली पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (मेयो) होणारा खर्च पाहता रुग्णांची संख्या कमी कशी, असा थेट प्रश्न विचारत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मेयोची उलटतपासणी केली. रुग्णसंख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बुधवारी त्यांनी मेडिकल व मेयो रुग्णालयाला अचानक भेट दिली. या भेटीने दोन्ही रुग्णालय प्रशासनाची तारांबळ उडाली.डॉ. लहाने यांनी मेडिकलला सकाळी १० वाजता बाह्यरुग्ण विभागातून (ओपीडी) पाहणीला सुरुवात केली. यावेळी उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधला. परिसरात विविध बांधकामे सुरू आहेत. त्यांचीही पहाणी करून कामाविषयी जाणून घेतले. प्रलंबित प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेतली.रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर त्यांनी महाविद्यालयाची पाहणी केली. प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध विभागप्रमुख तसेच प्राध्यापकांसोबतही त्यांनी हितगुज केले. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, अधीक्षक डॉ. राजेश गोसावी व इतर वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. मेडिकलमधून त्यांनी थेट मेयो रुग्णालय गाठले. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ‘ओपीडी’मध्ये शुकशुकाट पाहून आश्चर्यव्यक्त केले. रुग्णालयावर होणारा खर्च पाहता रुग्णांची संख्या कमी का, असा थेट प्रश्न विचारला. यावेळी रुग्णालय प्रशासनाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.रेडिओलॉजी विभागात ‘टोकन सिस्टम’ राबवाडॉ. लहाने यांनी ‘ओपीडी’मध्ये असलेल्या रेडिओलॉजी विभागाची पाहणी केली. रुग्णांची संख्या आणि जागा पाहता ताळमेळ बसते का, असा थेट प्रश्न विचारला. रुग्णांच्या सोयीसाठी ‘टोकन सिस्टम’ राबविण्याचा सूचना केल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.‘एमआरआय’ची जागा पाहिलीखरेदी प्रक्रिया होऊन कंपनीकडून प्रतीक्षेत असलेल्या मेयोचा ‘एमआरआय’वर चर्चा केली; सोबतच स्थापन होणाऱ्या जागेची पाहणीही केली. त्यांनी ‘सिटी स्कॅन’च्या खरेदीबाबत पाठपुरावा करण्याच्या सूचनाही केल्या. रुग्णालयातील स्वच्छतेबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाचे कौतुकही केले. यावेळी त्यांच्यासोबत अधिष्ठाता डॉ. अजल केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर, उपअधीक्षक डॉ. रवी चव्हाण, डॉ. सागर पांडे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.आंबेडकर रुग्णालय होणार २५० खाटांचेकामठी रोडवरील व मेयोच्या अधिपत्याखाली येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनुसंधान केंद्राची पाहणी यावेळी डॉ. लहाने यांनी केली. यावेळी मेयो प्रशासनाने या रुग्णालयाच्या पाठविलेल्या प्रस्तावावर चर्चाही केली. मेयोने या रुग्णालयासाठी २५० खाटांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. १३० कोटींच्या या प्रकल्पात पहिल्या टप्प्यात औषधवैद्यकशास्त्र, नेत्ररोग विभाग, मानसोपचार विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग व प्रसूती विभाग व अस्थिरोग विभाग असणार आहे. प्रत्येक विभागाला ४०-४० खाटांचा वॉर्ड, अतिदक्षता विभाग व चार अद्ययावत अशी शस्त्रक्रियागृहे असणार आहेत.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)