शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

१०० कोटींचा निधी कसा उभारणार ?

By admin | Updated: October 20, 2015 03:47 IST

एलबीटी रद्द करण्यात आल्यानंतर महापालिके तील कर्मचाऱ्यांचे वेतन एक महिना उशिराने होत आहे. दिवाळी अग्रीम

नागपूर : एलबीटी रद्द करण्यात आल्यानंतर महापालिके तील कर्मचाऱ्यांचे वेतन एक महिना उशिराने होत आहे. दिवाळी अग्रीम देण्यासाठी २५ कोटींचे कर्ज घेण्याची वेळ महापालिकेवर आली आहे. अशा परिस्थितीत सिमेंट रस्त्यासाठी १०० कोटींचा निधी कसा उभारावा असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यातच स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेला दर वर्षाला ५० कोटींचा निधी उभारावा लागणार आहे. असे असतानाही प्रकल्पाला विलंब होत नसल्याचा दावा पदाधिकारी व अधिकारी करीत आहेत. काही महिन्यापूर्वी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील सिमेंट रस्त्यांची घोषणा केली होती. यातील पहिल्या टप्प्यातील कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. २५ किलोमीटर लांबीच्या रिंगरोडच्या सिमेंटीकरणासाठी केंद्र सरकारकडून २९४ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. तसेच शहरातील ४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी ४३४ कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यामुळे शहातील सिमेंट रस्त्यांचे काम केव्हा सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)पहिल्या टप्प्यातील काम अर्धवटमाजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कार्यकाळात ३० किलोमीटरच्या सिमेंट रस्त्यांची योजना तयार करण्यात आली होती. यावर १०० कोटीचा खर्च गृहीत धरण्यात आला होता. दोन वर्षात हे काम पूर्ण करावयाचे होते. या कामाच्या भूमिपूजनाला चार वर्षे झाली. परंतु अद्याप अर्धेही काम झालेले नाही. त्यामुळे शहरातील सिमेंट रस्त्याचे काम केव्हा सुरू होणार, अशी चर्चा आहे.